ETV Bharat / state

वर्ध्यात 'मिशन मास्क' मोहिमेत 1 लाखाचा दंड वसूल; 586 नागरिकांवर कारवाई - covid rule violators wardha

कोरोनाच्या काळात 'मिशन मास्क' ही मोहीम राबवत शहरात वाहन चालकांना दंड आकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची लाट जिल्ह्यात पुन्हा येऊ नये म्हणून प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.

मिशन मास्क मोहिम
मिशन मास्क मोहिम
author img

By

Published : Nov 4, 2020, 3:42 AM IST

वर्धा - कोरोनाच्या काळात 'मिशन मास्क' ही मोहीम राबवत शहरात वाहन चालकांना दंड आकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील काही दिवसात शहरात विनामास्क बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत आलेली घट या गर्दीतून पुन्हा वाढू नये म्हणून मोहिम राबवली जात आहे. मागील तीन दिवसात 586 लोकांकडून 1 लाख सहा हजाराचा दंड वसूल केला आहे.

वर्ध्यात 'मिशन मास्क' मोहीमेत 1 लाखाचा दंड वसूल
दिवाळी सण 10 दिवसांवर येऊन ठेपला असून नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. या वाढलेल्या गर्दीमुळे आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे सध्या आटोक्यात असलेली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मिशन मास्क मोहीम सुरू केली आहे. त्रिसूत्री पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सेवकांना योग्य माहिती देण्याचे आवाहन केले जात
मिशन मास्क मोहिम
मिशन मास्क मोहिम
२०० रुपये दंड'मिशन मास्क' मोहिमेत महसूल, पोलीस, ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे पथक शहरातील विविध भागात जाऊन कारवाई करत आहेत. मागील तीन दिवसात मास्क न लावता फिरणाऱ्या 586 व्यक्तींवर 200 रुपये प्रमाणे दंडाची कारवाई करण्यात आली. यासह 8 दुकानदारांवर नियमाचे उल्लंघन केल्याने दंड आकारण्यात आले आहे.
मिशन मास्क मोहिम
मिशन मास्क मोहिम
आत्तापर्यंत 2 हजार जणांना दंडजिल्ह्यात 141 पथकांनी 1 हजार 819 मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. यासह 135 दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत 3 लाख 60 हजार 550 रुपये दंड वसूल केला. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, आणि चारही विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.