ETV Bharat / state

'केंद्राचे धोरण शेतकऱ्याला उद्धवस्त करणारे'

मराठा समजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात होणारी एमपीएससी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी समाजातील अने नेत्यांनी पुढाकार घेतला. पण, त्या समाजातील तरुणाची इच्छा नसून ती इच्छा राजकीय नेत्यांची होती. यातून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोपी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Oct 31, 2020, 9:38 PM IST

Updated : Oct 31, 2020, 10:53 PM IST

वर्धा - केंद्राचे धोरण हे शेतकरी विरोधी धोरण आहे. साधे गणित आहे. ज्यावेळी कांद्याचे उत्पादन कमी होते त्यावेळी कांदा आयात करायचे असते आणि ज्यावेळी कांद्याचे उत्पादन जास्त होते, त्यावेळी कांदा निर्यात करायचा असतो. मात्र, केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचे धोरण असल्याचे टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

बोलताना मंत्री वडेट्टीवार

ते वर्ध्याच्या सेवाग्राम येथे पत्रकारांशी बोलत होते. ते वर्ध्यात कॉंग्रेचे राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.

  • मराठा समाजाच्या जागा सोडून इतर भरती करावी

मराठा आरक्षणामुळे मेगा भरती पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, मराठा समाजासाठी 12 टक्के जागेवर भरती न करता उर्वरीत जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी.

  • आरक्षणाने राजकीय पोळी भाजण्याचे काम

मराठा समजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात होणारी एमपीएससी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी समाजातील अने नेत्यांनी पुढाकार घेतला. पण, त्या समाजातील तरुणाची इच्छा नसून ती इच्छा राजकीय नेत्यांची होती. यातून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचा आरोपी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे.

  • उर्मिला यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य

उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेसाठी नाही तर राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतो. त्यामुळे त्यांना जिथे जावे वाटते त्यांनी तिथे जावे, त्यांनाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा - केंद्राकडून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचे काम - बाळासाहेब थोरात

Last Updated : Oct 31, 2020, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.