वर्धा - आज सामाजिक क्षेत्रात येणारे नवे युवा कार्यकर्ते विविध पर्यायी विकासासाठी काम करत आहेत. शेती, पर्यटन, शिक्षणाच्या किंवा ऊर्जेच्या क्षेत्रातील या सगळ्यांना संघर्षाशी जोडणे आवश्यक आहे. निरंतरतेचे आणि जीवतेचे प्रतीक संघर्ष आहे. जीवतेचा उपयोग आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या गरजा भागविण्यासाठी करून घेता येईल. हेच या कार्यक्रमातून साधले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणल्या. त्या शहरातील सेवाग्राम आश्रमातील नई तालीम परिसरात विज्ञान आणि गांधी संमेलनात आल्या होत्या.
प्रत्येकाने आपल्या जीवनात गांधीजींच्या ज्ञानाला आणि विज्ञानाला अनुसरून बदल करता येईल याच विचार केला पाहिजे. असा विचार करणारा समुदाय नवी ताकद निर्माण करु शकतो. ज्यातून विरोधी दिशेने चालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आवाहन देता येईल. त्यासाठी निवडणुकीच्या राजकारणात उतरणे आवश्यक नाही, असे गांधीजीनी दाखवून दिलं आहे, अशाही त्या यावेळी म्हणाल्या.
गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त या संमेलनाचे शहरात आयोजन केले होते. गांधीजींच्या जीवनात अनन्य साधरण महत्व असणारे विज्ञान या संमेलनातून मांडण्यात आले. गांधींचे विज्ञान वस्तूंच्या पलीकडे जाऊन मानव समूहाचे संबंध, त्यात अहिंसा आणि सत्याचा अवलंबल होता. आपण काल आज आणि उद्या या तिन्ही बाबींवर गांधींच्या विज्ञानातून मंथन करु शकतो. असेच मंथन या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही केले. अशा विचारांचा जागर झाला तर आपण गुलामगिरीतुन बाहेर पडू शकतो, असे संमेलनाचे संयोजक म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्रहासह अनेक राज्यातून गांधी आणि त्यांचे विज्ञान समजून घ्यायाला गांधीवादी या संमेलनात सहभागी झाले होते. समारोप सत्रात मंचावर मागं संग्रहालयाच्या विभा गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर, संयोजक विनय र.र. विजयाताई आदी उपस्थित होत्या. यात गांधींजींच्या १६ संस्थानासह विविध २१ सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.