ETV Bharat / state

'बँका जाणीवपूर्वक कर्ज देत नसतील तर गुन्हे दाखल करा'

जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा बँकांची बैठक घेऊन पाठपुरावा करावा, अशी सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

Agri minister Dadaji Bhuse
कृषिमंत्री दादाजी भुसे व इतर
author img

By

Published : Jun 2, 2020, 8:36 PM IST

वर्धा- जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज वाटपाच्या विषयाकडे लक्ष द्यावे, असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. जर काही बँका जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलत होते.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषिमंत्री यांनी नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांचा खरीप हंगाम आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

कर्ज वाटपासाठी बँकाकडे पाठपुरावा करावा
खरीप हंगाम जवळ आला आहे. वर्धा जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे 1 हजार 29 कोटी रुपयाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ 37 कोटी रुपये कर्ज वाटप झालेले आहे. पण कर्जमाफीचा प्रश्न न सुटल्याने बँका नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी कृषिमंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे कर्जवाटपाला गती यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनदा बँकांची बैठक घेऊन पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत काही शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रलंबित आहे. कारचे आदेश असले तरी रिझर्व्ह बँकेचे आदेश बँकांना आले नसल्यानेे ही कर्जमाफी प्रलंबित आहे. यासह बँकेच्या ऑटोमाईज सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. त्या अनुषंगाने लवकरच आदेश प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आलेल्या वैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे व उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी नागपूर येथे बैठकीत उपस्थित राहून जिल्ह्याची माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.