ETV Bharat / state

लोकसभेसाठी वर्ध्यात गुरुवारी होणार मतदान; प्रशासन सज्ज - loksabha election

अमरावती जिल्ह्यातल्या एकूण पाच तालुक्यातील ५ लाख ९९ हजार १९३ मतदार आपला हक्क वर्धा लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे.  यात १०५८ दिव्यांग मतदार देखील आहेत. तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज
author img

By

Published : Apr 10, 2019, 2:25 PM IST

वर्धा - लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात वर्धा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदारसंघात वर्धा जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातल्या ५ तालुक्यांचा समावेश होतो. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस मोदी लाटेत स्वार झाल्याने त्यांनी २ लाख १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी काँग्रेसच्या चारूलता टोकस यांच्याशी त्यांची लढत होत आहे.

निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

अमरावती जिल्ह्यातल्या एकूण पाच तालुक्यातील ५ लाख ९९ हजार १९३ मतदार आपला हक्क वर्धा लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे. यात १०५८ दिव्यांग मतदार देखील आहेत. तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

या वर्धा लोकसभेत मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे या अमरावती जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश होतो. त्या अनुषंगाने ६९५ मतदान केंद्र असणार आहे. मतदारसंघात मतदानासाठी एकूण ३ हजार ६० अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १ हजार ३३६ पोलिसांचा समावेश आहे. यात आयजीपी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक असा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. यात काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस व विद्यमान भाजपा शिवसेना युतीचे खासदार रामदास तडस या दोन प्रमुख उमेदवारात लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सह दिगग्ज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. तर काँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांच्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्धेत प्रचार सभा घेतली होती.

Intro:वर्धा लोकसभेकरिता गुरुवारी मतदान
अमरावती जिल्ह्यातील पाच तालुके
इलेक्शन पार्ट्या रवाना

अमरावती जिल्ह्यातील १४तालुक्यापैकी पाच तालुक्याचा वर्धा लोकसभा मतदारसंघात समावेश असून वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उद्या दि.११अप्रिल रोजी गुरुवारी होणार आहे,आज बुधवारी धामणगाव रेल्वे व मोर्शी तहसील कार्यालयातुन इलेक्शन पार्ट्या सकाळी रवाना झाल्या अमरावती जिल्ह्यातील एकूण पाच तालुक्यातील५लाख९९हजार१९३ मतदार आपला हक्क वर्धा लोकसभा निवडणुकीत बजावणार आहे यात१०५८दिव्याग मतदार देखील आहे, तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक१८एप्रिल रोजी होणार आहे
अमरावती जिल्ह्यातील एकूण14 तालुक्यापैकी 9 तालुक्याचा अमरावती लोकसभा मतदारसंघात समावेश आहे तर उर्वरित पाच तालुक्याचा वर्धा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे,वर्धा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उद्या दि.११एप्रिल गुरुवार रोजी होणार आहे,या वर्धा लोकसभेत मोर्शी,वरुड,धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्याचा समावेश आहे त्या अनुषंगाने वर्धा लोकसभेत अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यातील६९५मतदान केंद्र असणार आहे,अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातुन ही वर्धेची लोकसभा निवडणुक होनार आहे,या निवडणुकीसाठी १६४ वाहने लागणार आहे, या मतदारसंघातमतदानासाठी एकूण३.०६० अधिकारी व कर्मचारी असे मनुष्यबळ लागणार आहे, तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी१३३६पोलीसांचा समावेश आहे यात आयजीपी,जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक असा पोलीस बंदोबस्त राहणार आहे आज बुधवारी मोर्शी व धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयातुन मतदानासाठी इलेक्शन पार्टी रवाना झाल्या आहेत वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण16 उमेदवार रिंगणात असून यात काँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस व विद्यमान भाजपा शिवसेना युतीचे खासदार रामदास तडस या दोन प्रमूख उमेदवारात लढत होणार आहे,वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सह दिगग्ज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या तर काँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांच्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्धेत प्रचार सभा घेतली होती त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिष्ठा पणाला दिगग्ज नेत्यांनी लावली आहे उद्या गुरुवारी वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.