वर्धा - आर्वी तालुक्यातील खरांगणा वनपरिक्षेत्र विभागाअंतर्गत सुकळी उभारच्या जंगल परिसरातील टेकडीवर मृत बिबट्या आढळून आला. ज्या जाळ्यात त्याचा अडकून मृत्यू झाला ते जाळे रानडुक्कर पकडण्यासाठी लावला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, यात बिबट्या अडकून त्याचा मृत्यू झाला. तसे रानडुक्कर सुद्धा अडकले. अडकलेला बिबट्या हा नर असून तीन ते चार वर्षे त्याचे वय आहे.
वनपरिक्षेत्रात येणाऱ्या बोथली नटाळा नजीकच्या सुकळी उभार जंगल परिसरातील टेकडीवर बिबट्या आढळून आल्याची माहिती वनविभागाच्या मिळाली. यावेळी खरांगणा वन विभागाचे एसीएफ ठाकूर, तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. ताल्हण यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
रानडुक्कर सुद्धा विना परवानगीने मारता येत नाही. मात्र, हे जाळे लावणाऱ्या शिकाऱ्याचा उद्देश हा बिबट्या मारण्यासाठी की डुक्करसाठी याचा तपास वन विभागाचे पथक करत आहेत. वर्धा तालुक्यातील मांडवा शिवारात एका बिबट्याची शिकार झाली होती. यावेळे त्याचे पंजे आणि शेपूट कापून नेले होते. वनविभागाने तत्काळ पावले उचलत काही लोकांना अटक सुद्धा केली होती. या प्रकरणात सुद्धा लवकर आरोपी अटक केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.