वर्धा - कोरोनाबाधित मृत्यूची संख्या वाढत आहे. यामुळे मृत्यूनंतर त्या मृतदेहापासून संसर्ग होऊ शकतो का, यासारखे प्रश्न अनेकांना पडले असतील. यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात मृतदेह हा दफनविधी करण्यात आला. मात्र, कोरोनाबाधित मृतदेहापासून संसर्ग होतो का? या प्रश्नासह जागतिक आरोग्य संघटनेचे काय म्हणणे आहे, यावर दृष्टीक्षेप टाकणारा हा वृत्तात.
इंद्रजित खांडेकर यांचा परिचय
वर्ध्यातील कस्तुरबा रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाला प्राध्यापक म्हणून डॉ. इंद्रजित खांडेकर हे कार्यरत आहेत. त्यांनी काही वैदकीय क्षेत्राच्या अभ्यासक्रमातील लैंगिक अत्याचार पीडितेची होणारी टेस्ट कशी वैदकीय पातळीवर चुकीची आहे. यावर रिपोर्ट तयार करून अभ्यासक्रमातुन काढून टाकण्यात एक लढा दिला होता. त्यात त्यांना यश आले होते.
कोविड-१९ संक्रमित असलेल्या मृतदेहाची प्रतिष्ठा मान सन्मान जपायला हवा
मृतदेहांपासून आरोग्याला मोठा धोका असतो, असा जो सर्वसामान्य व्यापक समज आहे. तो चुकीचा असून त्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकते की साथीच्या आजाराने ग्रस्त असलेला मृतदेह हा दुसऱ्यांना रोगांची लागण करू शकतो. याचे कारण सांगताना त्यांनी कोरोनाबाधित रुग्ण असल्यास विषाणू मृत्यूनंतर मानवी शरीरात जास्त काळ टिकत नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लू.एच.ओ.) जाहीर केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ज्या लोकांचा संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला आहे. त्याला अग्नी द्यावा अथवा दफन करावा हा त्यांच्या कुटुंबियाचा प्रश्न आहे. कारण मृतांच्या सन्मान हा त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग आहे. त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला पाहिजे. तसेच, संपूर्णपणे त्यांचे संरक्षण केले पाहिजे. या संदर्भात डब्लू.एच.ओने 23 मार्च 2020 ला निर्देशित केले आहे. पण यासह खबरदारीच्या अनुषंगाने काही सूचना सुद्धा केल्या आहेत.
काय आहेत त्या सूचना
नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात देताना फक्त जवळच्या नातेवाईकाला (योग्य त्यापीपीई ड्रेससह) मृत शरीर आरोग्य कर्मचार्यांद्वारे एका मीटरच्या अंतरावरून दाखविले जावे.
आपल्या प्रिय व्यक्तीचे मृत शरीर सर्व मानक सावधगिरी बाळगून रूग्णालयाद्वारे पॅक केले जावे. बॉडी बॅग / पॅकिंगच्या बाहेरील भागांना देखील प्रतिबंधित केले जावे. यापद्धतीने काळजी घेतली असल्यास मृत शरीराकडून संसर्ग होण्याचा कोणताही अतिरिक्त धोका उद्भवत नाही. रुग्णालयाद्वारे पॅक केलेला मृतदेह घरात किंवा वाहतुकीच्या वेळी उघडू नये. याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
जर शेवटच्या वेळेस रुग्णालयात मृतदेह बघायचा असेल तर रुग्णालयाचे आरोग्य सेवा कर्मचारी (सर्व मानक सावधगिरी बाळगून) बॉडी बॅग उघडून मृतदेहाचा फक्त चेहरा पाहण्याची परवानगी देऊ शकतात.
मृतदेहाची हाताळणी करणाऱ्या नातेवाईक सर्जिकल मास्क हातमोजे घालून सावधगिरीची मानक तत्वे पाळावे.
धार्मिक लिपी वाचणे, पवित्र पाणी शिंपडणे यासारख्या इतर धार्मिक विधी करु शकतात. पण मृतदेहाला हात न लावता या विधी करण्यात याव्या. यासह मृतदेहाची आंघोळ करणे, चुंबन घेणे, आलिंगन आणि इतर क्रिया ज्यामुळे मृतदेहाला स्पर्श होऊ शकेल, अशा प्रक्रियेला मनाई आहे.
अंत्यसंस्कार किंवा दफनानंतर कुटुंबातील सदस्यांनी हातांची स्वच्छता करावी. शेवटचा संस्कार करण्यासाठी आपण राख गोळा करू शकता. यामुळे कोणताही धोका नाही. स्मशानभूमी अथवा दफनभूमीवर सामाजिक किंवा शारिरीक अंतरावर उपाय म्हणून मोठ्या संख्येने जमा होऊ नये.
जर आरोग्य कर्मचार्यांनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी सरकारने दिलेल्या निर्देशांचे सावधगिरीने पालन केल्यास कोविड- 19 पॉझिटिव्ह असलेल्या मृत व्यक्तीच्या शरीरापासून संसर्ग होण्यास टाळला जाऊ शकतो. शिवाय मृतदेहाची विटंबना होण्यापासून वाचेल, असेही डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी सांगितले.