वर्धा- वर्ध्यात आज मंदिरे खुले करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तालुक्यातील संत लहानुजी महाराजांच्या मंदिराबाहेर भाजपाचे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भजन-कीर्तन करत हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मंदिरातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील सहा महिन्यापासून मंदिर बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह मंदिरे खुले करण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली.
वर्ध्यातील वंजारी चौकातील दुर्गा माता मंदिरा समोर देखील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले. दारूची दुकाने उघडी करणाऱ्या उद्धव सरकारने मंदिरे उघडी करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, भाजपायुमोचे अध्यक्ष वरून पाठक यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी मोठया संख्यने उपस्थित होते.
हेही वाचा- #CORONA EFFECT : ...अन्यथा कलाकारांना आत्महत्या करावी लागेल!