वर्धा - महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे सगळेच पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असेल, तर ते अपक्षालाही द्यावे, महाविकास आघाडी सरकारला समर्थन देणाऱ्या घटकपक्षांत अपक्षपण आहे. असे विधान शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू वर्धा येथे केले. ते स्थानिक विश्राम गृहात आजोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेतकरी आंदोलन असेच सुरू राहीले, तर उद्रेक होईल -
मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशातील सर्वात मोठे असे हे आंदोलन आहे. मोदी सरकार वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन दाबण्याचे प्रयत्न करत आहे. कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा कोणताही अंत पाहू नये, हे आंदोलन असेच सुरू राहीले, तर त्याचा उद्रेक होईल, असेही ते म्हणाले.
घटना टाळण्यासाठी दिल्या सुचना -
वर्धेच्या उत्तम गलवा कंपनीती जी घटना झाली. ती दुर्दैवी आहे. यात कंपनी मालक आणि मॅनेजर दोषी आहे. यात व्हेक्टरी कायद्यानुसार टेक्निकल रिपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल करू, असेही ते म्हणाले. त्यात पुन्हा महाराष्ट्रयामध्ये अशा घटना होऊ नये, यासाठी राज्यभर सूचना दिल्या आहेत. मदतीसाठी कामगार आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. कमीत कमीत एक लाख आणि जास्तीत जास्त 15 लाख मदत झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी सेवाग्राम रुग्णलायात जाऊन जखमी कामगारांची भेट घेत प्रकृती बद्दल जाणून घेतले.
ते भाजपचे आमदार फुटू नये म्हणून बोलतात -
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिडी शिवाय फासे पलटवू, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतला. फडणविसांना असे म्हटल्या शिवाय जमणार नाही. महाविकास आघाडीत येण्यासाठी त्यांच्या आमदारांची रांग लागली आहे. त्यांना आमदार सांभाळून ठेवायचे आहे. त्यामुळे ते असे बोलले, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
एवढे मनाला लावून घ्यायची गरज नाही -
नाना पाटोले यांनी राजीनामा दिल्या नंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आला आहे. आज सामनामध्ये राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याचे अधोरेखित केले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अध्यक्षांच्या लेव्हलाचा प्रश्न आहे. या संदर्भात सामनामध्ये लेख आला असेल, तर अधिवेशनाच्या पूर्वी अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारसमोर थोडी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हे वक्तव्य एवढे मनाला लावून घ्यायची गरज नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.