ETV Bharat / state

Illegal abortion case : अवैध गर्भपात प्रकरणात महिला डॉक्टरचे पती डॉ. नीरज कदमला अटक - Wardha Update

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील बहुचर्चित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात (Illegal abortion case) सहावा आरोपी म्हणून डाॅ. रेखा कदम यांचे पती डाॅ. नीरज कदमला (Dr. Rekha and her husband Dr. Neeraj Kadam) आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी चाललेल्या दिवसभराच्या घडामोडीनंतर पोलिसांनी डॉ. नीरज यांची भूमिका जाणून घेत अटक केली.

Neeraj Kadam arrested
डॉ. नीरज कदमला अटक
author img

By

Published : Jan 16, 2022, 9:45 AM IST

वर्धा - कदम रुग्णालयाच्या गर्भपात केंद्राचा परवाना हा डाॅ.शैलेजा कदम यांच्या नावे आहे. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठीचे सूचनापत्र बुधवारी दिले होते. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णायलात दाखल केल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच कदम रुग्णालय परिसरात डॉ. नीरज कदम यांना सोबत घेत पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने घराची झाडा झडती घेतली.

Neeraj Kadam
डॉ. नीरज कदम

दरम्यान पोलिसांना कदम यांच्या घरात वन्या प्राण्याची कातडी सापडली तर आरोग्य विभागाच्या पथकला शासकीय रुग्णालयातील औषधसाठा आणि इंजेक्शनही सापडले जे आरोग्य विभागाने जप्त केले आहेत. दिवसभराच्या तपासणीनंतर आर्वी पोलिसांनी डॉ. नीरज कदम यांची भूमिका स्पष्ट झाल्याने मध्यरात्री त्याना अटक केली.आतापर्यंत आरोपीची संख्या सहावर पोहचली आहे.

डॉ. निरज कदम हे आर्वीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असताना त्यांनी शासकीय रुग्णालयातील औषध साठा तसेच रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना स्वतःच्या खाजगी दवाखान्यात पाठवून स्वतःचा फायदा तर करून घेतला नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.