वर्धा - हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. आर्वी आणि पुलगाव येथे मूक मोर्चा तर सेलूत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
आर्वी शहरातील प्रमुख सुभाषचंद्र बोस पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली होती. मोर्चाचा समारोप उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देऊन करण्यात आला. मोर्चात आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सवावलाखे यांच्यासह डॉ. अरुण पावडे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'हे' मंत्री महोदय करणार लाक्षणिक उपोषण
पुलगावातही बंदसह मोर्चा -
या घटनेच्या निषेधार्थ पुलगावातही सर्वपक्षीय बंदचे आयोजन करण्यात आले होते. नाचणगाव नाका येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. तसेच सेलूत बंद पाळत मोर्चा काढून रोष व्यक्त करण्यात आला. मोर्च्यामध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला-पुरुष समाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा - 'ती' वाचावी, तिच्या वेदना थांबाव्यात...