ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पेट्रोल टाकल्यापासून ते पीडितेच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा घटनाक्रम...

हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले.आज अखेर तिचा मृत्यू झाला आहे.

hinganghat burn case
हिंगणघाट जळीतकांड
author img

By

Published : Feb 10, 2020, 10:27 AM IST

Updated : Feb 10, 2020, 10:36 AM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. हृदयविकाराचा धक्का आल्याने पहाटे 24 वर्षीय पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज(सोमवार) सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिला रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे ठिकठिकाणी मोर्चे काढून तिला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली. तसेच हिंगणघाट आणि वर्ध्यामध्ये कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता.

'3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी'मध्ये काय काय घडले पाहा -

सोमवार 3 फेब्रुवारी -

  • शिक्षिका कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
  • पीडितेला उपचारासाठी हिंगणघाट शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास तिला नागपुरातील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयात हलवण्यात आले.
  • आरोपी विक्की नगराळे याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली.
    hinganghat burn case
    पेट्रोल टाकण्यापूर्वी आरोपीने केली होती सर्व तयारी

मंगळवार 4 फेब्रुवारी -

  • पीडितेला न्याय देण्यासाठी हिंगणघाट शहरात मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीयांकडून हिंगणघाटमध्ये बंद पाळण्यात आला. तसेच राज्यातील इतर शहरांमध्येही आंदोलने, मोर्चे काढण्यात आले.
  • आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
    hinganghat burn case
    आरोपी विकास नगराळे

बुधवार 5 फेब्रुवारी -

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडितेची रुग्णालयात भेट घेतली. तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवू व त्यासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती करू, गृहमंत्र्यांची माहिती.
    hinganghat burn case
    वर्धा बंद, राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, मोर्चा

शुक्रवार 7 फेब्रुवारी -

  • आरोपीला मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेता रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली.

शनिवार 8 फेब्रुवारी -

  • आरोपीला न्यायालयात हजर केले असता 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
  • पीडितेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले.
    hinganghat burn case
    निषेधार्थ जमसमुदाय रस्त्यावर

रविवार 9 फेब्रुवारी -

  • डॉक्टरांनी तिच्यावर चौथी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. श्वास घेता येत नसल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
    hinganghat burn case
    उपचार करणाऱया डॉक्टरांची पत्रकार परिषद

सोमवार 10 फेब्रुवारी -

  • पहाटे हृदयविकाराचा धक्का आल्याने पीडितेची प्रकृती खालावली होती. त्यानंतर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

हिंगणघाटसंदर्भातील सर्व बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -

हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...

हिंगणघाटच्या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसीय उपवास, गांधीचे स्मरण करत आत्मक्लेश आंदोलन

हिंगणघाट जळीतकांड : अखेर झुंज संपली, आज सकाळी पीडितेचा मृत्यू

हिंगणघाट जळीतकांड : 'हे' मंत्री महोदय करणार लाक्षणिक उपोषण

हिंगणघाट जळीतकांड : देवा 'तिला' वाचव, वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.