वर्धा - शहरात तापमानाचा पारा ४५.७ अंशावर गेला आहे. येथील तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या त्रासात वाढ झालेली दिसून येत आहे.
दिवसा वाहणाऱ्या गरम हवेच्या वाऱ्यामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. रोजच्या व्यवहारावरदेखील याचा परिणाम झाला आहे. गुरुवारी ४५.५ वर असणारे तापमान शुक्रवारी २ अंशांनी वाढलेले पाहायला मिळाले. शहरातील तापमानात होणारी वाढ ही आरोग्याच्या दृष्टीने काळजी वाढवणारी असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणने आहे.