वर्धा - शहरात आज सायंकाळी भारतीय हिंदू सेनेच्या वतीने मंदिराचे दार खुले करण्यासाठी हवनपूजा आंदोलन करण्यात आले. रामनगरच्या तुळजाभवानी मंदिरात पंच कुंडी यज्ञ करण्यात आला. मुख्यमंत्री यांनी मधूशाला खुली केली, आता मंदिर खुले करण्यात यावी यासाठीच नवरात्रीच्या पर्वावर हे आंदोलन करण्यात आले.
वर्ध्यात भारतीय हिंदू सेनेचे मंदिर खुले करण्यासाठी हवनपूजा - वर्धा भारतीय हिंदू सेना बातमी
नवरात्रीच्या पर्वावर मंदिर खुले करण्यासाठी दरवाजे बंद मंदिरात पाच जोडप्यांच्या उपास्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यात अग्निकुंडात अहुत्या देऊन सरकारला जागे व्हा आणि मंदिरे खुले करा. मधूशाला खुली झाली मंदिर का नाही, असा सवाल या निमित्याने हिंदू सेनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश अग्निहोत्री यांनी या निमित्ताने केला.
भारतीय हिंदू सेनेचे मंदिर खुले करण्यासाठी हवनपूजा