वर्धा - कोरोनाच्या लढ्यात दिवसरात्र काम करताना जीवाचा धोका पत्करून डॉक्टर-परिचारिका वैद्यकीय सेवा देत आहेत. या सेवा देताना सुरक्षेच्या दृष्टीने लागणाऱ्या साहित्याची कमतरता पडू नये. तसेच वैदकीय सेवा देताना अनेक रुग्णांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता यावा. यासाठी सिंधी समाजाची गुरुनानक धर्मशाळेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात साहित्य भेट देण्यात आले. हे साहित्य आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
गुरुनानक धर्मशाळेची उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय साहित्य भेट उपजिल्हा रुग्णालयात सेवा देताना रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. हे रुग्ण तपासताना काही अंतर ठेवून तपासणी करावी लागते. शिवाय काळजी घेत असताना अपुऱ्या सोयी सुविधांमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यास अडचणी येतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावपासून बचाव ऐवजी धोका होऊ शकतो. यामुळे काही महत्वाचे साहित्य ज्यामध्ये 25 पीपीई किट, एक पेटी सॅनिटायझर, हातमोजे आदी साहित्य उपजिल्हा रुग्णालयात भेट देण्यात म्हणून आले. शिवाय याचा फायदा रुग्ण तपासणीसह रुग्ण आणि वैदकीय सेवा देणाऱ्या दोघांना सुद्धा होणार आहे. या अडचणीच्या काळात हे साहित्य नक्कीच मोलाची मदत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी सांगितले.
या संकटाच्या काळात वैद्यकीय सेवा देणारे देवदूत ठरतात. यामुळे सेवा देतांना योग्य काळजी घेता यावी. तसेच रुग्णसेवा देताना त्याची आणि घरी गेल्यावर कुटुंबाची काळजी घेता यावी. यासाठी मदत देताना बाधा होऊ नये. यासाठी समाजाला सेवा देणाऱ्या डॉक्टरांना आम्ही गुरुनानक धर्मशाळेच्या वतीने सेवा देऊ शकलो यात आनंद असल्याचे सचिव टेकचंद मोटवणी यांनी सांगितले. तसेच तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनीही उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी तहसीलदार विद्यासागर चव्हाण उपजिल्हा रुगणलाय आर्वीचे वैदकीय अधीक्षक डॉ मोहन सुटे, डॉ. कोल्हे, गुरूननाक धर्मशाळेचे अध्यक्ष सुदामा मोटवनी, उपाध्यक्ष सुरेश बुधवानी, सचिव टेकचंद मोटवनी, पदाधिकारी दीलीप कटीयारी देवीदास कोटवानी,अनील लालवानी, सिंधी समाज सेवक आणि व्यापारी सघटना, रोहीत मोटवानी प्रा. राजेश सोळंकी उपस्थिती होते.