ETV Bharat / state

शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी करणारा गोंधळी समाज जातपंचायतीच्या विळख्यात! - CHHATISGAHR

शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी करणारा गोंधळी समाज जातपंचायतीच्या विळख्यात.... कायद्याला विरोध करत चालवली जाते जातपंचायत व्यवस्था... वर्ध्यात जात पंचायतीने वाळीत टाकलेले रमेश धुमाळ जात पंचायतीला देणार कायदेशीर उत्तर

धुमाळ कुटुंबीय
author img

By

Published : Feb 24, 2019, 7:53 PM IST

वर्धा - जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शत्रूच्या भूमीत गोंधळी समाज हेरगिरी करत होता. आज, मात्र हा समाज जात पंचायतीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र दिसून येत आहे. जातपंचायतीच्या नावाने समाजातील नागरिकांना वाळीत टाकण्याचे प्रकार आजही पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात सुरुच आहेत. येथील गोंधळी समाजात कायद्याला विरोध करून जातपंचायत व्यवस्था आजही सुरू आहे.

धुमाळ कुटुंबीय

याच जात पंचायतीमुळे वाळीत पडलेलेल्या देवळी येथील रमेश धुमाळ यांच्या कुटुंबाला मागील नऊ वर्षपासून याचे चटके सोसावे लागत आहेत. या बहिष्कारावर १३ मार्चला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास याला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे धुमाळ यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

धुमाळ कुटुंबीय

रमेश धुमाळ हे गोंधळी जोशी समाजातील उच्चशिक्षित आहे. त्यांनी १० वर्षापूर्वी समाजाने वाळीत टाकण्यात आलेल्या कुटुंबातील मुलीशी विवाह केला आणि येथूनच जातपंचायतीच्या जाचक अटींचा अन्याय सुरू झाला. रमेश धुमाळ हे कुठल्याही लग्न समारंभात गेले असता, त्यांच्यावर बहिष्कार टाकलो जातो.

धुमाळ कुटुंबीय

जात पंचायतीने रमेश यांना वाळीत टाकलेल्या कुटुंबाशी सोयरीक केल्यामुळे पाच हजराचा दंड ठोठावला होता. त्यावर ते दंड भरण्याची तयारही झाले. मात्र, त्यांच्या उच्चशिक्षणाला आडकाठी ठरवण्यात आले. कारण, समाजात घेतले तर जात पंचायतीला धोका निर्माण होईल म्हणून त्यांना टाळाटाळ सुरू झाली. या प्रकरणी ९ वर्षानंतर नागपूर येथील एका लग्न समारंभात बैठक होणार असल्याची माहिती गोसावी यांना समजली होती. याच बैठकीला अभाअनिसचे महाराष्ट्र सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांना रमेश धुमाळ यांनी मदतीची मागणी केली. नागपुरातील या लग्न समारंभानिमित्त बैठकीत चर्चा झाली, यावेळीही काहींनी धुमाळ यांना समाजात घेण्यास विरोध केला. त्यानंतर योग्य निर्णय घेण्यासाठी १३ मार्च नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे जात पंचायतीच्या बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वस्त करण्यात आले आहे.

चटके सोसणारी अशी अनेक कुटुंब -

जात पंचायतीच्या बहिष्काराचे चटके सोसणारे रमेश धुमाळ हे एकटे नाहीत. यांच्यासारखी सुमारे 30 ते 35 कुटुंब अश्याच बहिष्काराला समोर जात असल्याची माहिती धुमाळ यांनी सांगितली. मात्र, धुमाळ यांनी या जाचाला वाचा फोडली आहे. यात होणाऱ्या बैठकीत तीन मागण्या केल्या आहेत. जात पंचायत बरखास्त करा, दंड संहिता रद्द करा,ही अपमानकारक कायमची बंद करत सर्वांनाच मान देण्याची मागणी केली आहे. याला आडकाठी केल्यास न्यायालयीन प्रक्रियेला समोर जाण्याची तयारी धुमाळ यांनी दर्शविली असून अभाअंनिसचे गजेंद्र सुरकार यांनी याला पाठिंबा जाहीर केला आहे.

undefined

जातपंचायती न्यायासाठी नसून पैसे खाण्याची दुकाने -

जातपंचायतीत कायदे, शिक्षा या लिखित नसून फतवा काढण्यात येतो आणि सर्व समाज तो मान्य करतो. जात पंचायती बंद झाल्यास पैसे खाण्याचे दुकान बंद होण्याची भीती या समाजातील पंचाना आहे. यात काही पंचांचे अनावश्यक शौक पुरविले जात असल्याचा आरोपही धुमाळ यांनी यावेळी केला. हा सर्व प्रकारच चुकीचा असल्याचे धुमाळ सांगतात. त्यामुळे असा प्रकार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे तरच समाजाचा विकास होऊ शकतो, असेही मत धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्रात कायदा पण छत्तीसगढला नाही

जात पंचायतीमध्ये सात वाड्याचे पंच न्यायदानाचे काम करतात. यात पाच वाड्या या विदर्भातील अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर गोंदिया येथे आहेत. तर दोन वाड्या या छत्तीसगढ येथील बिलासपूर आणि रायपूर जिल्ह्यात आहेत आणि त्या वाड्यातील सदस्यच या जातपंचायत विरोधी कायद्यास विरोध करत असल्याने धुमाळ यांनी सांगितले. त्यामुळे जातपंचायत विरोधी कायद्याची भीती ही केवळ महाराष्ट्रातील वाड्यांना आहे. छत्तीसगढच्या वाड्या ही प्रथा बंद पडू देत नसल्याचाही आरोप धुमाळ यांनी केला.

समाजात सक्रिय असणारे गट -

undefined

रेणुराई कदमराई, डमरूकार नंदीकार, जोशी, चुडबुडके बुडबुडके असे गट पडले आहेत. यात हे गट पुरोगामी विचाराकडे वाटचाल करत आहेत. तर काही गट आजही त्यांच्या जुन्या जातपंचायत पद्धतीला प्राधान्य देतात. मात्र, हा सर्व समाज यापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंच्या गोठात जाऊन गुप्त माहिती काढून आणण्यास मदत करत होता. मात्र, शिवरायांच्या न्याय दानाच्या पद्धतीचा अवलंब यांनी केला नसल्याची खंत धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

Intro:R_MH_24_FEB_WARDHA_JAAT_PANCHAYAT

शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरी करणाऱ्या समाज आज जातपंचायतीच्या विळख्यात, कायद्याला विरोध करत चालते व्यवस्था

जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शत्रूच्या भूमीत गोंधळी समाज हेरगिरी करत होता. आज मात्र जातपंचायतीच्या विळख्यात अडकला आहे. समाजातील जातपंचायतीच्या नावाने समाजातील नागरिकांना वाळीत टाकण्याचे प्रकार आजही पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात सुरूच आहे. देवळी येथील रमेश धुमाळ यांच्या कुटुंबाला मागील नऊ वर्षपासून याचे चटके सोसावे लागत आहे. या बहिष्कारावर 13 मार्चला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास याला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे पत्रकार परिषदेत संगीतले.

रमेश धुमाळ हे गोंधळी जोशी समाजातील उच्चशिक्षित आहे. त्यांनीब10 वर्षपूर्वी वाळीत असलेल्या कुटुंबातील मुलगी दुर्गा हिच्याशी विवाह झाला आणि येथून जातपंचायत जाचक अटींचा अन्याय सुरू झाला. रमेश धुमाळ हे कुठल्याही लग्न स्मरंभात गेले असता मिळणारा टीक्क्याचा मान न देता बहिष्कार टाकण्यात आला. पाच हाजराचा दंड ठोठावण्यात आला हे दंड भरण्याची तय्यारी दाखवली. पण इथे मात्र त्याच उच्चशिक्षित असल्याने आडकाठी ठरले. समाजात घेतल तर जात पंचायतीला धोका निर्माण होईल म्हणून त्यांना टाळाटाळ सुरू झाली. 9 वर्षानंतर नागपूर येथील नागपूर येथील लग्नात बैठक होणार असल्याचे समजले.

याच बैठकीला अभाअनिसचे महाराष्ट्र सरचिटणीस गजेंद्र सुरकार याना रमेश धुमाळ यांनी मदतीची मागणी केली. नागपुरातील या लग्न समारंभा निमित्य बैठकीत चर्चा झाली यावेळी काहींनी विरोध केला. योग्य निर्णय घेण्यासाठी 13 मार्च नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे जात पंचायतीच्या बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वस्त करण्यात आले.

चटके सोसणारे अनेक कुटुंब असल्याची माहिती......

बहिष्काराचे चटके सोसणारे रमेश धुमाळ हे एकटे नाही. यांच्या सारखेच 30 ते 35 कुटुंब अश्याच बहिष्काराला समोर जात असल्याचे सांगितले. धुमाळ यांनी या जाचाला वाचा फोडली आहे. यात होणाऱ्या बैठकीत तीन मागण्या केल्या आहे. जात पंचायत बरखास्त करा, दंड संहिता रद्द करा,ही अपमानकारक कायमची बंद करत सर्वांनाच मान देण्याची मागणी केली आहे. याला आडकाठी केल्यास न्यायालयीन प्रक्रियेला समोर जाण्याची तय्यारी दर्शविली असून अभाअंनिसचे गजेंद्र सुरकार यांनी याला पाठिंबा जाहीर केला आहे.

जातपंचायती न्यायासाठी नसून पैशे खाण्याची दुकाने

जातपंचायतीत कायदे सजा ह्या लिखित नसून फतवा काढतो आणि सर्व समाज तो मानतो. जात पंचायती बंद झाल्यास पैशे खाण्याचे दुकान बंद होण्याची भीती पंचाना आहे. यात काहींचे पंचाचे शौक पुरविले जाते असल्याचा आरोप सुद्धा धुमाळ यांनी केला. चुकीची असल्याचे धुमाळ सांगतात. त्यामुळे असा प्रकार कणाऱ्यांचार कारवाई झाल्यास चांगला बदल होऊन समाज मुख्य प्रवाहात येईल अशी आशा या निमित्याने व्यक्त केली.

महाराष्ट्रात कायदा पण छत्तीसगढला नाही----
यात सात वाड्या या जात पंचायत मधून न्यायदानाचे काम करतात. यात पाच वड्या या विदर्भातील अकोला,यवतमाळ, वर्धा, नागपूर गोंदिया आहेत तर दोन वाड्या या छत्तीसगढ येथील बिलासपूर आणि रायपूर जिल्ह्यात असल्याने त्या विरोध करतात. त्यामुळे कायद्याची भीती ही केवळ महाराष्ट्रातील असल्याने छत्तीसगढच्या वाड्या जा जात पंचायत नष्ट होऊ देत नसल्याचा आरोप धुमाळ करता.

समाजात सक्रिय असनारे गट ....

रेणुराई कदमराई, डमरूकार नंदीकार, जोशी, चुडबुडके बुडबुडके असे गट पडले आहेत. यात हे गट पुरोगामी विचाराकडे वाटचाल करत आहे तर्वकही आजही त्याचा पद्धतींव जुन्या जात पंचायतला साथ देत आहे. हाच वर्ग शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंच्या किल्यात जाऊन गुप्त माहिती काढून आणण्यास मदत करत असे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.