ETV Bharat / state

...अन वाहत्या नाल्याकाठीच 'तिने' सोडला जीव, वर्ध्यातील धक्कादायक घटना

आर्वी तालुक्यातील सावद(हेटी) येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने उपचाराअभावी 16 वर्षीय मुलीने काठावरच प्राण सोडले. जयती गेंदालाल सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे. पावसाळ्याचा दिवसात अनेकदा या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडते. यासाठी अनेकदा मागणी करूनही या नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही. दरम्यान, जयतीच्या मृत्यूने तरी निद्रिस्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागतील का, असा संतप्त सवाल स्थनिक नागरिक करत आहेत.

author img

By

Published : Sep 18, 2019, 9:39 PM IST

मृत जयती गेंदालाल सोलंकी

वर्धा - आर्वी तालुक्यातील सावद(हेटी) येथे नाल्यावरून पाणी वाहत असल्याने उपचाराअभावी 16 वर्षीय मुलीने काठावरच प्राण सोडले. जयती गेंदालाल सोलंकी असे मृत मुलीचे नाव आहे.

उपचाराअभावी जयती गेंदालाल सोलंकी या16 वर्षीय मुलीने प्राण सोडले

जयतीला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. हे लक्षात येताच कुटुंबियांसह गावकऱ्यांनी दवाखाण्याकडे धाव घेतली. पण, नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी होते. पाण्यातून वाट काढता न आल्याने जयतीने नाल्याच्या काठावरच जीव सोडला. अखेर तिचा मृतदेहच घरी न्यावा लागला. या घटनेमुळे सोलंकी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सावद हेटी या वस्तीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी नाला पार करावा लागतो. पावसाळ्याचा दिवसात अनेकदा या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडते. यासाठी अनेकदा मागणी करूनही या नाल्यावरील पुलाची उंची वाढण्यात आलेली नाही. या गावातून जवळपास २५ विद्यार्थी दररोज शाळेत जातात. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबाण्याची वेळ अनेकदा आली आहे. पावसाळ्यात मुले घरी परत येईपर्यंत आई-वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

हेही वाचा - छत्रपती शिवरायानंतर नरेंद्र मोदीच जाणते राजे - माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर

नाल्याच्या वरच्या बाजूला दहेगाव लघु धरण आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पुलावरून पाणी वाहत राहते. दुसरा पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दरम्यान, जयतीच्या मृत्यूने तरी निद्रिस्थ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जगतील का, असा संतप्त सवाल स्थनिक नागरिक करत आहेत.

Intro:वर्धा स्टोरी

mh_war_02_pulavarun_paani_vis_7204321

...अन वाहत्या नाल्याकाठीच 'तिने' जीव सोडला,

- पुलावरून पाणीच असल्याने दवाखान्यात पोहोचलीच नव्हती

- उपचाराअभावी चिमुकलीचा मृत्यू

वर्धा - आज देशभर रस्ते मोठ-मोठे रस्त्याचे ज
जाळे विणले जात आहे. पुल, रस्ते बांधले जात असताना, दुसरीकडे ग्रामिण भागातील
नाल्यांवरील पुलावरून अजूनही पावसाळयात पाणी वाहत असल्याने रस्ते बंद राहतात. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील सावद येथे असाच 16 वर्षीय मुलीचा जीव नाल्यावरून पाणी वाहत असल्याने काठावरच प्राण सोडले. जयती गेंदालाल सोलंकी असे मृतक मुलीचे नाव आहे.

आर्वी तालुक्याच्या सावद (हेटी) येथें राहणारी जयती सोलंकी इयत्ता नववीत शिकत होती. जयतीला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. हे लक्षात येताच कुटुंबियांसह गावकऱ्यांनी दवाखाण्याकडे धाव घेतली. पण, नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्यातून वाट काढता न आल्याने जयतीने नाल्याच्या काठावरच जीव सोडला. अखेर तिचा मृतदेहच घरी न्यावा लागला. या घटनेमुळं सोलंकी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. मागील 20 वर्षांपासून हेच वास्तव पहावयास मिळत आहे.

सावद हेटी या वस्तीतील रहिवाशांना आवागमन करण्यास नाला पार करावा
लागतो. पावसाळ्याचा दिवसात अनेकदा या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडत असते. यासाठी अनेकदा मागणी करूनही या नाल्यावरील पुलाची उंची वाढलेली नाही. याच गावातून जवळपास २५ विद्यार्थी शाळेत जातात. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर एक तर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबावे लागण्याची वेळ अनेकदा आली. गावातील लोक असल्यास गावांतच राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात मुलं घरी परत येईपर्यंत आईवडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो.

नाल्याच्या वरच्या दिशेला दहेगाव लघु धरण आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर महिन्यांपर्यंत पुलावरून पाणी वाहत राहते. बरेचदा धोका पत्करूनही गावकरी येजा करतात. दुसरा पर्याय नसल्याने जीव मुठीत घालून प्रवास करतात. पण पाण्याच्या प्रवाह जास्त असल्यास हे जीवावर बेतू शकते यात जयतीच्या मृत्यूने तरी निद्रिस्थ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जगेल का की आणखी एखाद्या जयतीची मृत्यूची वाट पाहतील हे पाहावे लागेल
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.