ETV Bharat / state

गांधी विचारक सुमनताई बंग यांचे निधन - वर्धा लेटेस्ट

ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासच्या अग्रणी व स्त्री सक्षमीकरणाच्या मार्गदर्शक सुमनताई बंग यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले होते, तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही विनोबांच्या भूदान, ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर आपला ठसा उमटवला होता.

गांधीविचारक सुमनताई बंग यांचे निधन
गांधीविचारक सुमनताई बंग यांचे निधन
author img

By

Published : May 4, 2021, 7:18 AM IST

वर्धा - ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासच्या अग्रणी व स्त्री सक्षमीकरणाच्या कृतीशील मार्गदर्शक सुमनताई बंग यांनी सोमवार (3 मे रोजी) दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान सेवाग्राम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर आपला ठसा उमटवला होता.

स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर उमटवला होता ठसा

सुमनताई या महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांच्या सहचारिणी व समाजसेवी अशोक बंग व डाॅ. अभय बंग यांच्या मातोश्री आहेत. सुमनताईंनी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर आपला ठसा उमटवला होता. बचत गटाचे काम देशपातळीवरही फारसे रुळले नसताना, त्या काळात वर्धा जिल्ह्यातील परितक्त्या व विधवा स्त्रियांना सोबत घेऊन बचत गटांचे जाळे त्यांनी विणले. आयुष्यभर स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्यरत असतानाच शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवक युवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम निस्वार्थपणे सुमनताईंनी त्यांच्या जीवन प्रवासात राबविले.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

जगण्यात साधेपणा आणि विचारांमध्ये वैज्ञानिकता स्वीकारलेल्या सुमनताई बंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या पश्चात नातलगांसोबतच सामाजिक कार्यातून जुळलेला मोठा परिवार पोरका झाला आहे. त्याच्यावर आलोडी येथील चेतना विकास फार्म परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि मोजकेच सहकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यात योगदान

त्यांचा जन्म १९२५ साली, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात झाला. सुमनताईंनी विद्यार्थीदशेत सेवादलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही विनोबांच्या भूदान, ग्रामदान आणि ग्रामस्वराज्य आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनातही सहभागी होत त्यांनी स्त्रियांचे नेतृत्व केले होते.

हेही वाचा - 'ममतांचे अभिनंदन केले म्हणून मोदी-शाहांनाही चंद्रकांत पाटील धमकी देणार का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.