वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर, मनोरा व मालेगावात बुधवारी सकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात धुके दिसून आले. या धुक्यामुळे वाहनाद्वारे प्रवास करणे कठिण झाले होते.
हेही वाचा - वाशिम: घरकुलाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर; तक्रारदाराचे टॉवरवर चढून आंदोलन
दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात थंडी जाणवू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून वाशिम जिल्ह्यातील काही भागात आज धुक्याचे प्रमाण अधिक असून सूर्यप्रकाश दिसेनासा झाला होता. शिरपूर व मालेगावामध्ये प्रचंड धुके पडले त्यामूळे थंडीने कुडकुडत कामावर जाणारे कामगार अणि विद्यार्थीही अंगावर स्वेटर घातलेले पाहायला मिळाले.
हेही वाचा - स्वच्छतागृहातला व्हिडिओ व्हायरल; १८ वर्षीय मुलीची आत्महत्या