ETV Bharat / state

वर्धा : पोलीस विभागातील एका महिलेसह पाच जणांना पदोन्नती

भविष्यातील रिक्त पदाची गरज पाहता २३० पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचे जाहीर झाले. याचा राज्यातील ६३६ जणांना लाभ मिळाला.

author img

By

Published : Apr 25, 2019, 7:15 PM IST

वर्धा : पोलीस विभागातील एका महिलेसह पाच जणांना पदोन्नती

वर्धा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा घेण्यात येते. यातील २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत आयोगाने ८२८ जणांची नियुक्ती केली होती. यात भविष्यातील रिक्त पदाची गरज पाहता २३० पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचे जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील ६३६ उमेदवार असून वर्धा पोलीस विभागातील पाच जणांच्या खांद्यावर दोन स्टार लागणार आहे. या पाच जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

पोलीस विभागात आरक्षणावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विभागीय परीक्षेत पुन्हा आरक्षणाचा लाभ दिला जात नाही. मात्र २०१६ मध्ये काहींना लाभ देत त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र इतर काहींना २३० गुण मिळून सुद्धा आरक्षणाचा पुन्हा लाभ न देता नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर काही उमेदवारांनी हरकत नोंदवल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. याचा तिढा सुटला असून २०१६ मध्ये २३० गुण मिळवलेल्या ६३६ जणांना पदोन्नती मिळाली.

वर्ध्यातील सायबर सेलला कार्यरत असणाऱ्या निलेश कटोजवार, अक्षय राऊत, वडनेरला कार्यरत विक्रम काळमेघ, गिरड येथील रामेश्वर दराडे, पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला प्रतिभा निनावे यांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

Intro:R_MH_25_APR_WARDHA_PADONNATI_VIS_1

पोलीस विभागातील पाच जणांना लागणार 'दोन स्टार', 2016 मध्ये दिली होती परीक्षा
- तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाला मान
- वर्ध्यातील 5 जणांना पीएसआय पदोन्नती, 1 महिलेचं समावेश
- फित निघून झळकणार खांद्यावर दोन स्टार
- महाराष्ट्रातील 230 पेक्षा अधिक गुण असलेले 636 उमेदवारांना पदोन्नती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा घेण्यात येते. यातील 2016 मध्ये झालेल्या परीक्षेत आयोगाने 828 जनांची नियुक्ती केली होती. यात भविष्यातील रिक्त पदाची गरज पाहता 230 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या पदोन्नती देण्याचे जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील 636 उमेदवार असून वर्धा पोलीस विभागातील पाच जणांच्या खांद्यावर दोन स्टार लागणार आहे.

वर्ध्यातील पाच जणांमध्ये एक महिलेचाही समावेश आहे. यात 2016मध्ये परीक्षा घेण्यात आली. पोलीस विभागात कार्यरत असताना आरक्षणावर नियुक्ती झाली असते. अशातच विभागीय परीक्षेत पुन्हा आरक्षणाचा लाभ दिला जात नाही. मात्र 2016 मध्ये काहींना लाभ देत नियुक्त करण्यात आले. मात्र इतर काहींना 230च्या घरात गुण मिळून सुद्धा आरक्षणाचा पुन्हा लाभ न देत नियुक्ती देण्यात आली नव्हती. करण्यात आली. यात काही उमेदवारांनी हरकत नोंदवल्याने प्रकरण न्यायालयात दाखल झाले. अखेर आता याचा तिढा सुटलाअसून 2016 मध्ये 230 गुण मिळवलेल्या 636 जणांना पदोन्नती मिळाली. यात वर्ध्यातील पाच जणांना पदोन्नती मिळाली.

विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या 2016च्या परीक्षेमध्ये काहींची थेट नियुक्ती करण्यात येते. भविष्यात वेळोवेळी रिक्त होणारे पदाचा विचार केला विभागाकडून केला जातो. याचाच अंदाज घेत अधिक उमेदवार यामाध्यमातून नियुक्त केल्या गेले. वर्ध्यातील सायबर सेलला कार्यरत असणाऱ्या निलेश कटोजवार, अक्षय राऊत, वडनेरला कार्यरत विक्रम काळमेघ, गिरड येथील रामेश्वर दराडे, पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला प्रतिभा निनावे यांना पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

फित जाऊन खांद्यावर लागणार स्टार####

पोलीस विभागात अनेक जण पदावर कार्यरत असताना पदोन्नती मिळावी अशी आशा बाळगतो. काहींना त्यांचा नियुक्तीच्या वर्षानोवर्षाने पदोन्नती मिळते. तर काही जिद्द चिकाटीने अभ्यास करत अंतर्गत परीक्षेत झेंडा रोवत पदोन्नती मिळवतात. अश्याच या पाच जणांना वरिष्ठांसोबत काम केल्यान खांद्यावर असनारी पट्टी ज्याला पोलीस भाषेत फित म्हणतात ते निघणार आणि पीएसआय म्हणून ओळख देणारे 'दोन स्टार' खांद्यावर झळकणार.

कर्मचारी ते ऑफिसर होण्याच स्वप्न कष्टाची चीजच

पोलीस विभागात काम करताना कर्मचाऱ्यांना अधिकारी होणे हे एक गोड स्वप्नंच असते. हे वास्तवात उतरवणे तेवढेच कठीण जाते. अगोदरच कामाचा असणारा ताण सुट्टीचा अभाव, अभ्यासाचा ताळमेळ आणि जिद्द टिकवणे हे सोपे नसते. अनेकदा परीक्षादेऊन ही अपयश पदरी पडते. त्यामुळे हे यश म्हणजे कष्टाची चीज झाल्याची भावना निलेश कटोजवर आणि अक्षय राऊत यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.