मुंबई : हिंदू म्हणून बोलण्याची काही लोकांना लाज वाटत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच 'लाडकी बहीण' योजनेवरुनही त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातही हरियाणासारखी परिस्थिती विरोधकांची होणार असल्याचं ते म्हणाले.
मी त्यांना पुरून उरलो : 'गर्व से कहो हम हिंदू है' ही गर्जना बाळासाहेबांनी दिली, पण हल्ली हे बोलण्यास काही लोकांना लाज वाटते, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली ती शिवसेना आम्ही सोडवली. आम्हाला बोलत होते की, सरकार १५ दिवसांत पडेल, मी त्यांना पुरून उरलो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांना ठासून दोन वर्ष पूर्ण केले. मला हलक्यात घेऊ नका, मी मैदान पळून जाणार नसल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मला हलक्यात घेवू नका : "'गर्व से कहो हम हिंदू है' ही गर्जना बाळासाहेबांनी दिली. पण, हल्ली हे बोलण्यास काही लोकांना लाज वाटत आहे. पण आम्हाला लाज वाटत नाही. बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी गड्डारी केली ती शिवसेना आम्ही सोडवली. सर्वत्र भगवा सागर दिसत आहे. आम्हाला बोलत होते की, सरकार १५ दिवसात पडेल, मी त्यांना पुरून उरलो. सर्वांना ठासून दोन वर्ष पूर्ण केले. मला हल्क्यात घेवू नका, मी मैदान पळून जाणारा नाही. मी विरोधकांना पळवून लावतो," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे. अन्यायाविरोधात पेटून उठा हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्याय झाला म्हणून आम्ही उठाव केला. जर हे केलं नसतं तर शिवसैनिकांचा अपमान झाला असता, राज्य मागं गेलं असतं," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडीला ब्रेक लावला : "आपलं सरकार आलं नसतं तर कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. माझ्या लाडक्या बहिणींची योजनाही आली नसती. शासन आपल्या दारी आलं नसतं. त्यामुळं आपलं सरकार आलं आणि राज्यात विविध योजना आल्या. महाविकास आघाडीनं सर्व योजनांना ब्रेक लावला. बुलेट ट्रेन, जलयुक्त शिवार, मेट्रो कार शेड अशा प्रकल्पांना त्यांनी ब्रेक लावला. त्यामुळं महाविकास आघाडीलाही उखडून टाकलं," असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला.
दाढी मुद्द्यावरुन मारला टोला : "माझी दाढी त्यांना खुबते. त्यामुळं होती दाढी म्हणून तुमची महाविकास आघा़डी उद्धवस्त केली. त्यामुळं मला हकल्यात घेवू नका. मुंबईच्या रस्त्यांच्या कामात तुम्ही पैसे खाल्ले. आता आम्ही मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं लोकांची लूट करताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. तुम्हाला लोकांच्या सुखाची काही देणंघेणं नाही. कोरोना काळातही तुम्ही भ्रष्टाचार केलात. त्याचा हिशोब देणार का?" असा सवाल विचारत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा - "कितीही पिढ्या आल्या तरी आम्ही त्यांना गाडून टाकू", उद्धव ठाकरे कडाडले