ETV Bharat / politics

अजित पवारांच्या दौऱ्याची काँग्रेसच्या आमदाराकडून जय्यत तयारी; काँग्रेसनं केलं निलंबित - SULABHA KHODKE SUSPENDED

अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. नाना पटोले यांनी याबाबतची कारवाई केली.

SULABHA KHODKE SUSPENDED
नाना पटोले, सुलभा खोडके (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 7:30 PM IST

अमरावती : विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षाकरिता निलंबित करण्यात आलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरही सतत पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी प्रदेश कार्यालयाकडं प्राप्त झाल्यानं महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चैनीथला यांच्या निर्देशावरून नाना पटोले यांनी सुलभा खोडके यांना पक्षातून निलंबित केलं.

सुलभा खोडके यांचा परिचय : अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. बडनेरा विधानसभा मतदारसंघात त्या 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यात. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी त्यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रवी राणा यांच्यासोबत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सुलभा खोडके या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होत्या. 2014 च्या निवडणुकीत देखील रवी राणा यांच्याकडून सुलभा खोडके पराभूत झाल्यात.

सुलभा खोडके यांना काँग्रेसची उमेदवारी : अमरावती विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये काँग्रेसचे सुनील देशमुख हे भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. यामुळं सुलभा खोडके यांनी बडनेरा ऐवजी अमरावती विधानसभा मतदारसंघात पुढच्या राजकारणाची तयारी केली. 2019 च्या निवडणुकीत सुनील देशमुख हे भाजपाचे उमेदवार असताना आणि त्यावेळी अमरावतीचे माजी आमदार असणारे रावसाहेब शेखावत यांनी ऐनवेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेससाठी रिक्त असणाऱ्या अमरावतीच्या जागेवर सुलभा खोडके यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि त्या 2019 च्या निवडणुकीत निवडून आल्या.

पाचही वर्ष काँग्रेसपासून दुरावा : सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार म्हणून अमरावतीत विजयी झाल्यावर संपूर्ण शहर काँग्रेस त्यांच्यासोबत होतं. दरम्यान, सुनील देशमुख हे भाजपा सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यामुळं अमरावती शहर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सुनील देशमुख यांचा दबदबा निर्माण झाला. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचे देखील शहर आणि जिल्हा काँग्रेसमध्ये वर्चस्व असल्यामुळं स्थानिक काँग्रेसने सुलभा खोडके यांना महत्त्व देणं टाळलं. सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार असल्या तरी त्यांचे पती संजय खोडके हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पदावर होते. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास निकटवर्तीय अशी संजय खोडके यांची ओळख आहे.

स्पष्टीकरणानंतर काँग्रेसचा निर्णय : स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आमदार सुलभा खोडके यांना महत्त्व दिलं जात नसल्यासंदर्भात शनिवारीच संजय खोडके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. विशेष म्हणजे रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत येत असून, त्या कार्यक्रमाची खास तयारी आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात सुरू आहे. अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरभर झळकलेल्या पोस्टरवर सुलभा खोडके यांचा फोटो झळकत आहे.

महायुतीच्या उमेदवारीचे संकेत : महायुतीमध्ये अमरावती विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी सुटणार असं बोललं जात असून, अमरावतीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा खोडके याच निवडणूक रिंगणात असतील, असे संकेत खुद्द संजय खोडके यांनी दिलेत. एकूणच अमरावती विधानसभा मतदार संघातील घडामोडी पाहता काँग्रेसमधून सुलभा खोडके यांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.

होय पत्र मिळालं : आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आल्यासंदर्भात पत्र मिळालं असल्याचं सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांनी स्पष्ट केलं. यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी देखील खोडके यांच्या निलंबनाचे पत्र प्रदेश कार्यालयातून प्राप्त झालं असल्याचं म्हटलं.

हेही वाचा

  1. दसरा मेळाव्याची ठाकरे गटाची अनेक वर्षांची परंपरा मोडीत, 'हे' आहे कारण
  2. 'ते' सोनं लुटत आहेत, तुमच्या हातात आपट्याची पानं, राज ठाकरेंचा पॉडकास्टवरून हल्लाबोल
  3. ...अन् मंत्री दीपक केसरकरांनी घरोघरी जाऊन मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.