ETV Bharat / state

नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार- माजी आमदार सरोज काशिकर

author img

By

Published : Dec 8, 2020, 10:11 PM IST

Updated : Dec 8, 2020, 10:43 PM IST

शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशिकर ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, की या कायद्यात नक्कीच सुधारणा अपेक्षित आहे. पण म्हणून काही तिन्ही पूर्ण रद्द झाले पाहिजे, असे नाही. या बदलाची आम्ही 35 वर्षांपासून वाट पाहतो आहे.

माजी आमदार सरोज काशिकर
माजी आमदार सरोज काशिकर

वर्धा - नवीन कृषी कायद्यामुळे स्पर्धा होणार आहे. यातून शेतकऱ्याने फायदा होणार आहे. यामुळे कायद्याला समर्थन असल्याचे शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशिकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तसेच आजच्या भारत बंदला विरोध असल्याचेही त्यांनी म्हटले.

शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशिकर या ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, की या कायद्यात नक्कीच सुधारणा अपेक्षित आहे. पण म्हणून काही तिन्ही पूर्ण रद्द झाले पाहिजे, असे नाही. या बदलाची आम्ही 35 वर्षांपासून वाट पाहतो आहे. त्यामुळे बदल मान्य आहे. पण कायदा हटवावे याला आमचा विरोध आहे. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशभरात असलेल्या बंदला आमचा पाठिंबा नाही. इतकेच नाही तर, या बंदचा निषेध करतो, असेही काशिकर यांनी सांगितले.

नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार

हेही वाचा-"कृषी कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला प्रवृत्त करू"

चुकीच्या गोष्टींना समर्थन करणे शरद जोशींनी आम्हाला शिकवले नाही...

हा कायदा शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. आम्हाला कुठल्या पक्षाचे देणे घेणे नाही. आम्ही मागील 35 वर्षांपासून भांडत आहे. यात शेतकऱ्यांसाठी असणारे धोरण बदलत आहे. शेतकऱ्यांना स्वतःचा पायावर उभे राहायचे आहे. यात बाजार समिती काही बंद होणार नाही. चुकीच्या बाबीला समर्थन देने आम्हाला शिकवले नाही, अशी प्रखर भूमिका शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर यांनी सांगितले.

हेही वाचा-शेतकरी आंदोलन : शरद पवार, राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींना भेटणार

करार शेती काही जबरदरस्तीची नाही...

नवीन कृषी कायद्यात असलेली करार शेती म्हणजे जबरदरस्तीने शेती नाही. यापूर्वी गावात ठेकेपद्धतीने शेती व्हायची. या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष समर्थन देत आहेत. मात्र, ते शेतकऱ्यांसाठी नसून त्यांची राजकीय पोळी भाजण्याचे काम आहे.

या कायद्यात सुधारणा म्हणून शेतकऱ्यांसाठी खासगी न्यायालयाची मागणी...
काही अडचण आल्यास एसडीओकडे तक्रार करण्याची सुविधा आहे. पण, ज्याप्रमाणे इतर काही प्रकरणात खासगी न्यायालय आहे. याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी खासगी न्यायालयाची मागणी शेतकरी संघटना करत आहे. पुढेही पूर्ण होईपर्यत आम्ही मागणी करत राहू, असे शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशिकर यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीत पंजाबसह हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांनी आज देशभरात भारत बंद पुकारला.

Last Updated : Dec 8, 2020, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.