ETV Bharat / state

भीषण अपघातात कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यात यश - राष्ट्रीय महामार्ग 7 वर अपघात

राष्ट्रीय महामार्ग 7वर पहाटे ट्र्क आणि कंटनेरचा भीषण अपघात झाला.अपघातामध्ये कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

accident vehicles
अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Jun 7, 2020, 1:14 PM IST

वर्धा - राष्ट्रीय महामार्ग सातवर नागपूर आणि चंद्रपूर दरम्यान जाम येथील संतराम हॉटेलजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास ट्रक आणि कंटनेरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कंटनेरचा चालक केबिनमध्ये अडकला. क्रेनच्या मदतीने त्याला केबिनमधून बाहेर काढण्यात आले. कंटेनर चालक हा हैदराबादचा असून त्याचे नाव त्यागमा रामू असे आहे.

संतराम हॉटेलजवळ चालक ट्रक (क्रमांक MH 40 AK5974) रस्त्याच्या बाजूला उभा करत होता. एवढ्यात मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरच्या (HR 55, AB-0396) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, ट्रकचा चालकाची केबिन पूर्णपणे दबून गेली. यात कंटेनर चालक अडकला होता.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन मागवून ट्रकचालक त्यागमा रामू याला बाहेर काढले. तब्बल एका तासापेक्षा जास्त काळ तो अडकून राहिला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि राहूल कुमरे, विनोद थाटे, प्रवीण बागडे, दीपक जाधव यांच्या देखरेखीखाली मदतकार्य करण्यात आले. यानंतर अपघातग्रस्त ट्रक-कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.