ETV Bharat / state

रेमडेसिवीर औषधीच्या 17 हजार कुपींच्या पहिल्या स्टॉकचे वितरण; वर्ध्यातील कंपनीकडून उत्पादन - Remdesivir Production Wardha

वर्ध्यातील जेनेटिक सायन्स कंपनीकडून 17 हजार रेमडेसिवीर औषधीच्या कुपींचा पहिला स्टॉक हा आभासी पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंच्या उपस्थितीत वितरकाला सोपविण्यात आला. हे इंजेक्शन नागपूरसह इतर ठिकाणी वितरित होणार आहे.

17 thousand Remedesivir vials distributed Wardha
रेमडेसिवीर औषध १७ हजार कुपी वितरण
author img

By

Published : May 13, 2021, 8:31 PM IST

वर्धा - वर्ध्यातील जेनेटिक सायन्स कंपनीकडून 17 हजार रेमडेसिवीर औषधीच्या कुपींचा पहिला स्टॉक हा आभासी पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंच्या उपस्थितीत वितरकाला सोपविण्यात आला. हे इंजेक्शन नागपूरसह इतर ठिकाणी वितरित होणार आहे. यावेळी नितीन गडकरी यानी औषधीची पहिली खेप बाहेर पडल्याची माहिती फोनद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली.

17 thousand Remedesivir vials distributed Wardha
रेमडेसिवीर वितरण कार्याचे छायाचित्र

हेही वाचा - वर्ध्यात लसीकरण केंद्रांवर पाहाटेपासून रांग; जेष्ठ नागरिकांची फरफट

जेनेटिक कंपनीत 5 मे पासून रेमडेसिवीर औषध उत्पादनाला सुरवात झाली आहे. आतपर्यंत 1 लाख औषधीच्या कुपी तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच याचे वाटप होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून वर्ध्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर औषधीच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रात योग्य नियोजन करून त्याचे वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली.

गडकरी यांनी जेनेटिक कंपनीला दिली होती भेट

काही दिवसांपूर्वी मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धेला येऊन जेनेटिक कंपनीतील रेमडेसिवीर उत्पादनाची पाहणी केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमतीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, शिवाय काळाबाजारीला आळा बसणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.

विदर्भातील इतर औषधी कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल - सुनील केदार

पालक मंत्री सुनील केदार यांनी देखील कंपनीत जाऊन उत्पादनाची पाहणी केली होती. कोरोना काळात रेमडेसिवीर सारखे उत्पादन तयार करणारी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी वर्धा जिल्ह्यात आहे. या कंपनीमुळे विदर्भातील इतर औषधी कंपन्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जाईल, असे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले होते.

हेही वाचा - आर्वी तहसीलच्या रेकॉर्ड रुमला भीषण आग; आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.