वर्धा - महात्मा गांधाजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढत कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले. यात काँग्रेस असो की भाजप, दोन्ही पक्षांकडून गांधींच्या विचाराचे आम्हीच पाईक असल्याचे दाखवण्यात आले. यात भाजपच्यावतीने लालबहादूर शास्त्री चौकातून तर काँग्रेस सेवादलाच्यावतीने सेवाग्राम परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेवरून दोन्ही पक्षाांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपची पदयात्रा सोंग असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली तर, गांधीजी काही काँग्रेसचे एकट्याचे नाही, अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
हेही वाचा - गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने सेवाग्राम आश्रम गर्दीने फुलले होते. सेवाग्राम परिसरातून काँग्रेस सेवादलाच्यावतीने हुतात्मा स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. यापूर्वी त्याने सर्वधर्म प्रार्थना तसेच तुकडोजींच्या भजनातून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, सेवा दलाचे प्रभारी मंगलसिंग सोलंकी, अध्यक्ष विलास औताडे यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर उपस्थित होते.
हेही वाचा - 'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'
पदयात्रेला मोठ्या नेत्यांची दांडी-
यावेळी भाजपच्यावतीने लालबहादूर शास्त्री चौकातून यात्रा काढत वर्धा शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ याचा समारोप करण्यात आला. यापूर्वी ऊर्जामंत्री बावणकुळे यांनी सेवाग्राम येथे बापू कुटीला प्रार्थना करत आदरांजली वाहिली.
काँग्रेसचे हे हाल गांधी विचाराचां देखावा केल्याने झाले आहेत. त्यांच्या विचारांवर कधाीच काँग्रेसने सरकार चालवले नाही. गांधीजी काही कॉग्रेसचे नाही. काँग्रेसने गांधीजींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून टाचणीभर त्यांच्या विचारांवर चालले तरी भविष्य चांगले होईल, असा सल्ला ऊर्जामंत्री चंदशेखर बावणकुळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदर रामदास तडस, आमदार पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - गांधी @150 : रामोजी राव यांच्या हस्ते बापूंच्या प्रिय भजनाचे लोकार्पण
काँग्रेस सेवादलाच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपची गांधी संकल्प यात्रा सोंग असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी केली .पंतप्रधान विदेशाात जावून स्वत:ला राष्ट्रपिता म्हणवतात ही बाब निश्चित राष्ट्रपित्यांची उंची कमी करणारी आहे. यांची हीच बाब राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली म्हणावी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गांधींचे विचार धर्म भेद करणारे नव्हते, पण देशातील परिस्थिती पाहता हे गांधींच्या विचार कधी चालले नसल्याचे म्हणाले.
ऐन जयंतीलाही गांधाजींवरून दोनही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत तोंडसुख घेतले. यामुळे महात्मा गांधींच्या 150 व्या जंयंतीदिनी कोण गांधींच्या विचाराचे पाईक आहे याचा विचार जनतेनेच करावा.