ETV Bharat / state

भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहे.

भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:15 AM IST

वर्धा - ढासळलेली अर्थव्यवस्था, घटता विकास दर यांसह सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस कमिटीच्या वतीने 7 नोव्हेंबरला भाजप विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. बचत दर आणि गुंतवणूक दरात असलेली घसरण यासोबतच आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी दिली.

देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बेरोजगाचा प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत आहे. कृषी विकासाचा दर २ टक्क्यावर आला आहे. विमा कंपन्याही विम्याची रक्कम देण्यास तयार नाही. केंद्रीय पथक पाहणीकरिता बांधावर अजून पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे काँग्रेस राज्यभर आंदोलन करुन शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही लोंढे यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहे. यावेळी निरिक्षक अनंतराव घारड आणि नागपूरचे आमदार विकास ठाकरे तसेच स्थानिक आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले आहे.

Intro:mh_war_andolan_congress_vis_7204321

भाजप सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

वर्धा - भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळाचा विचार करता ढासळलेली अर्थव्यवस्था घटता विकास दर यासह सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बचत दर आणि गुंतवाणूं दारात असलेली घसरण यासह परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन जिल्ह्यात ठिकाणी आंदोलने केले जाणार आहे. आता गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंंढे यांनी दिली.

देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बेरोजगाचा प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत आहे. कृषी विकासाचा दर २ टक्क्यावर आला आहे. विमा कंपन्याही विम्याची रक्कम देण्यास तयार नाही. केंद्रीय पथक पाहणीकरिता बांधावर अजून पोहोचले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.त्यामुळे काँग्रेस राज्यभर आंदोलन करुन शेतकरी व सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रवक्ता लोंढे यावेळी म्हणाले.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार असून यावेळी निरिक्षक अनंतराव घारड आणि नागपुरचे आमदार विकास ठाकरे तसेच स्थानिक आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी केले आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.