ETV Bharat / state

काँग्रेसच्या गाडीला कितीही धक्का मारला तरी पुढे जाणार नाही - अर्थमंत्री मुनगंटीवार - विधानसभा

आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, येणारा मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे.

नगर परिषद माध्यमिक शाळा देवळीच्या इमारतीचे लोकार्पण करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मान्यवर.
author img

By

Published : Jul 15, 2019, 8:32 AM IST

Updated : Jul 15, 2019, 11:35 AM IST

वर्धा - काँग्रेस पक्षाचे इंजिन बंद झाले आहे. पक्षाला एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष असले तरी याचा काहीही फरक पडणार नाही म्हणून सहा लोकांनी मिळून काँग्रेसच्या गाडीला कितीही धक्का दिला तरी ते निवडणूकीत विजयाच्या दिशेने जाऊ शकत नाही, अशी जोरदार टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

काँग्रेसचे गाडीला कितीही धक्का मारला तरी पुढे जाणार नाही - अर्थमंत्री मुनगंटीवार

अर्थमंत्री मुनगंटीवार हे काल रविवारी जिल्हा दौऱयावर आले असता खासदार विकास निधी अंतर्गत नगर परिषद माध्यमिक शाळा देवळीच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचासोबत खासदार रामदास तडस, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, देवळी येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने कितीही स्वप्न बघितले तरी पुढचा मुख्यमंत्री आमचा होणार आहे. एवढे वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही कोणती विकासकामे केलीत ? जनता तुम्हाला का निवडून देईल, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसने निवडणुकीत फक्त मोदी हटावचा नारा देऊन प्रचार केला. आम्ही देश बचाव, देशाच्या प्रगतीचा नारा देतो. काँग्रेस जनतेपुढे मला पहा फुल वाहा, असे म्हणत गेली तरी जनतेला सर्व माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, येणारा मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे. शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर भाजप सेना यांच्यात विधानसभेसाठी समान वाटप होईल. तसेच जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस नाही. धरणे अजूनही कोरडी आहे म्हणून जिथे पाऊस कमी पडला आहे, तिथे शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी विभागाचा अभ्यास सुरू आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्यासाठी मंत्रीमंडळने मंजुरी दिली आहे, असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Intro:काँग्रेसचे इंजिन बंद पडले...कितिही धक्का मारला तरी पुढे जाणार नाही- अर्थमंत्री मुनगंटीवार

- काँग्रेस आता पुढे जाऊ शकत नाही

- मुख्यमंत्री महायुतीचाच, मित्रपक्ष सोडून जागेचे समसमान वाटप , एकत्र बसून जागांचे वाटप

- कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न
वर्धा - काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षसह कार्यकारी अध्यक्षांच्या नियुक्तिवार आज वर्धेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोचरी टीका केली. काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष असो की पाच कार्याध्यक्ष असो याचा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आता सहा लोकांनी मिळून काँग्रेसच्या गाडीला कितीही धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. आता ही गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेने जाऊच शकत नसल्याची सांगत जोरदार टीका केली. वर्धा जिल्ह्याच्या दौऱयावर होते. ते देवळी येथील नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसने कितीही स्वप्न बघितले तरी पुढचा मुख्यमंत्री आमचा होणार आहे. काँग्रेस हे म्हणत काही क्षण आनंद देऊ शकते. जनता तुम्हाला कशाला निवडणूक देतील असा सवाल करत एवढे वर्ष काँग्रेसची सत्ता होती काय केले? निवडणुकीत फक्त मोदी हटावचा नारा देऊन प्रचार केला. आम्ही देश बचाव, देशाच्या प्रगतीचा नारा देतो. तुम्ही मोदी हटावचा नारा देता. 47 वर्षांत तुम्ही कोणती विकासकामे केलीत. विकास कामे जनतेपुढं घेऊन जात नाही असे म्हणाले. काँग्रेसने जनतेपुढं मला पहा फुल वाहा म्हणत जायचे आता हे शक्य नाही. जनतेला हे माहीत आहे. त्यामुळे काँग्रेस आता पुढं जाऊ शकत नसल्याची टीका देवळीत केली.

येणारा मुख्यमंत्री महायुतीचा होणार असून शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर भाजप सेना यांच्यात विधांसभेसाठी समान वाटप होईल. जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरविणार असल्याचही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. अनेक धरणे कोरडी ठाक आहे. जिथे पाऊस कमी पडला आहे. तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. पाऊस पडायचा म्हटले तर ढग लागतील त्यांनतर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विभागाचा अभ्यास सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्यासाठी मंत्रीमंडळन मंजुरी दिली आहे असे अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी त्यांचासोबत खासदार रामदास तडस, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर, देवळी येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.