ETV Bharat / state

राज्यातील चित्रपटगृहांची दारे खुली; मात्र दाखवायला चित्रपटच नाहीत

चित्रपटगृह खुले बंद असताना अनेक चित्रपट रिलीज झाले. दुसरे नवीन चित्रपट मात्र बनु शकले नाही. चित्रपटगृह बंद असल्याने ते सर्व चित्रपट हे ऑनलाइन माध्यमांना विकले गेले. चित्रपटगृह खुले झाले असले तरी स्क्रीनवर दाखवण्यासाठी त्याच्याकडे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्न आहे.

author img

By

Published : Nov 6, 2020, 8:29 PM IST

Updated : Nov 7, 2020, 1:44 AM IST

cinemas-hall-in-maharashtra-are-open-but-owner-has-no-movie-to-show
महाराष्ट्रातील चित्रपटगृहांची दारे खुली; मात्र दाखवायला चित्रपटच नाही

वर्धा - संपूर्ण महाराष्ट्रभर मागील सात महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहे. अनलॉक फेजमध्ये 50 टक्के क्षमतेवर चित्रपट गृह सुरू करायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण दाखवायला चित्रपटच नसल्याने स्क्रीन आद्यपही ऑफ असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. नवीन चित्रपट हे ऑनलाइन माध्यमांना विकले गेल्याने परवानगी भेटूनही परिस्थिती जैसे थे असल्याचेही सांगितले जात आहे.

चित्रपटगृहे बंद असताना अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, दुसरे नवीन चित्रपट बनू शकले नाही. चित्रपटगृह बंद असल्याने अनेक चित्रपट ऑनलाइन माध्यमांना विकले गेले. त्यामुळे आता चित्रपटगृहे खुली झाले असले तरी स्क्रीनवर दाखवण्यासाठी त्याच्याकडे चित्रपट नसल्याने दाखवायचे काय, असा प्रश्न आहे. यामुळे चांगला चित्रपट रिलीज होण्याचा प्रतीक्षेत चित्रपटगृहचालक आहे. चित्रपटगृहांना 50 टक्के क्षमतेवर परवानगी मिळाली असली तरी महाराष्ट्रातील एकाही चित्रपटगृहात प्रेक्षक पोहचला नाही.

चित्रपटगृह मालकाशी संवाद साधताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी पराग ढोबळे
राज्यभरात किती स्क्रीन आहेत?

वर्ध्यात सर्व चित्रपटगृहे सिंगल स्क्रीन असून राज्यभरात साधारण 700 सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे आहेत. तेच मोठ्या शहरात एकापेक्षा जास्त स्क्रीन असणारे 250 चित्रपटगृहे आहेत. या सर्व चित्रपटगृहात दिवसभरात एकही शो चालला नसल्याचे 'सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन'चे माजी कोषाध्यक्ष तथा विदर्भ विभागाचे प्रादेशिक सदस्य प्रदीप बजाज यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

लॉकडाऊन काळात चित्रपट 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवर विकले गेले

सर्वत्र लॉकडाऊन असताना चित्रपट निर्मात्यांना रिलीज झालेल्या चित्रपटाचा खर्च काढण्यासाठी पर्याय म्हणून ओटीटी म्हणजे 'ओव्हर दि टॉप' या माध्यमांवर म्हणजेच नेटफलिक्स, अ‌ॅमेझॉन प्राइम, डिझ्नी हॉटस्टार यावर विकले गेले. त्यामुळे सध्या रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत, तर काही निर्माण झालेले पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे बंद थिएटरवर निर्माते आणि दिग्दर्शक यांना पर्याय मिळाला. मात्र, चित्रपटगृहांना मागील सात महिन्यांपासून टाळे लागल्याने आर्थिक नुकसान होत आहे. आता जरी चित्रपटगृहे सुरू झाली असली तरीही त्यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा आहे.

वितारकांकडे चित्रपट नाहीच, जुनेही मिळाले नाही

नवीन चित्रपट पुढील एक ते दोन महिन्यात येतील, असे संकेत आहेत. यात अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. तेच मध्यंतरीच्या काळात अनेक चित्रपट हे ऑनलाइन रिलीज झाल्याने त्यांना स्क्रीनवर चालवण्याऐवजी काही जुने हिट झालेले चित्रपट वितरकांना मागवण्यात आले असल्याचेही सांगितले जात आहे. पण वितरकांनी डिजिटल वितरणाचा खर्च न निघण्याच्या भीतीने ते पाठवण्यास सध्या असमर्थता दाखवली असल्याचे चित्रपटगृह चालक सांगत आहे.

चित्रपटगृह चालकांची मागणी काय?

चित्रपट व्यवसाय क्षेत्राला कोरोनाचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच बसला आहे. त्यामुळे यंदाचा 'प्रॉपर्टी टॅक्स' माफ व्हावा, चित्रपटगृहे बंद असताना आलेले किमान वीज बिल माफ करावे. यासह वीज बिल हे कमर्शियल दराने आकारले जात आहे, त्यात बदल करून ते इंडस्ट्रीयल दराने आकारुन सहकार्य करावे. तसेच स्थानिक प्रशासनाला दिला जाणारा शो टॅक्स बंद करावा, अशीही मागणी केली जात आहे. यासह राज्य जीएसटीतून पुढील दोन वर्ष सूट द्यावी, जेणेकरून व्यवसाय पुन्हा उभा होऊन तक धरू शकेल, अशी मागणी केली जात आहे.

सरकार आणि वितरक चित्रपटगृहांचेही नुकसान

राज्य सरकारला जीएसटी करातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये किमान 100 ते 200 कोटींचा फटका बसला आहे. साधरण शहरात दर महिन्याकाठी 2 ते 3 लाख तर मोठ्या शहरात यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणात लागणारा खर्च हा सुरूच आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल, दुरुस्तीसारख्या खर्चाचा समावेश आहे. लवकरच निर्माण झालेल्या या अडचणींवर तोडगा निघेल आणि सर्व काही पुन्हा सुरळीत सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- तांत्रिकाच्या बोलण्याला फसून स्वतःच्या मुलीची हत्या केल्या प्रकरणी एकाला अटक केली

Last Updated : Nov 7, 2020, 1:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.