वर्धा - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लागलेल्या आगीत सीसीटीव्ही कंट्रोल युनिट रुम जळून खाक झाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांचा तिसरा डोळा समजणारी सीसीटीव्ही यंत्रणा युनिट जळल्याने बंद पडली. अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी साधारण 35 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वर्ध्यात पोलिसांचा 'तिसरा डोळा' पडला बंद, सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट जळून खाक - wardha sp office news
पोलीस यंत्रणेचा तिसरा डोळा म्हणून सेवा देणारी सीसीटीव्हीचे मॉनिटर करणारे कंट्रोल युनिट पूर्णतः जळून खाक झाले. यामध्ये सर्व्हर, एलसीसीडी स्क्रिन कॉम्प्युटर, फर्निचर आदी साहित्याचा समावेश आहे.
वर्ध्यात पोलिसांचा 'तिसरा डोळा' पडला बंद, सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट जळून खाक
वर्धा - जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लागलेल्या आगीत सीसीटीव्ही कंट्रोल युनिट रुम जळून खाक झाल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. यामुळे पोलिसांचा तिसरा डोळा समजणारी सीसीटीव्ही यंत्रणा युनिट जळल्याने बंद पडली. अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी साधारण 35 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Last Updated : Mar 25, 2020, 11:41 PM IST