ETV Bharat / state

वर्ध्यात शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल - BOI manager

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जमाफी मिळूनही बँकेने कर्जमाफी न दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

गणपत भोरे
author img

By

Published : Jun 14, 2019, 8:54 PM IST

वर्धा- हिंगणघाट वडनेर येथील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जमाफी मिळूनही बँकेने कर्जमाफी न दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी मंत्रालयातुन चौकशीचे आदेश आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली होती.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडनेर शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

गणपत भोरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर गौतम जांभुळे असे गुन्हा दाखल झालेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वाधिक शाखा असल्याने बँक ऑफ इंडिया जिल्ह्याची लीड बँक आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकाऱयांनी चौकशी केली.

भोरे यांनी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी विष पिऊन करून आत्महत्या केली होती. साडेचार एकर शेती, पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा त्यांचे कुटुंब होते. मागील वर्षी त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे, ग्रामशक्ती या खासगी फायनान्स कंपनीच तीन लाख रुपये तसेच इतरांचे दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. याच विवंचनेतून आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांच्या दोन भावांना मिळाला. मात्र त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा बँकेमध्ये फेऱ्या मारल्या होत्या. पण, बँकेतून कर्जमाफी मिळण्याचे लक्षण दिसत नव्हते. यातुन त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. कर्जाचा वाढता डोंगर पाहून हताश झालेल्या गणपत भोरे यांनी आत्महत्या केली. उपविभागीय अधिकाऱयांच्या अहवालावरून वडनेर पोलिसांनी शाखा व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी ईटीव्हीशी बोलताना माहिती दिली.

बँक म्हणते ९०० रुपयांचे पत्र फेब्रुवारी २०१८ मध्ये दिले होते...

आत्महत्येनंतर चौकशीस आलेल्या अधिकाऱयांपुढे बँकेच्या अधिकाऱयांनी कर्जमाफीकरीता ९०० रुपये रक्कम भरावी लागत असल्याचे पत्र फेब्रुवारी २०१८ मध्ये गजानन भोरेंना दिल्याचे सादर केले. असे असले तरी केवळ ९०० रुपयासाठी ही आत्महत्या झाली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणने आहे. गणपत यांच्या दोन्ही भावांनी बँकेच्या व्याजापोटी ३६ ते ३८ हजार भरले. हाच तगादा गणपत यानांही बँकेने लावला होता.

Intro:वर्धा स्टोरी
बातमीत व्हिजवल आणि बाईट आहे. Pkg होऊ शकेल, डेस्कच्या विचाराधीन

शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बीओआयच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल
- मंत्रालयाच्या आदेशावरून प्रकरणाची दखल
- बँकेने असंवेदनशीलपणाचा गाठला कळस
- कर्जमाफी मिळूनही बँकेने कर्जमाफी ना दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप
- बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखेतील प्रकार
- महाराष्ट्रातील कदाचित पहलीच घटना

वर्धा- हिंगणघाट वडनेर येथे शेतकऱ्यांना विषारी औषध घेऊन फरवरी महिन्यात आत्महत्या केली. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांचा आदेशाने चौकशी केली. बँक ऑफ इंडियाच्या वडनेर शाखेच्या मॅनेजरवर शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी मंत्रालयाच्या आदेशाने सुरू झाली होती. यात आता गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणपत भोरे अस मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. तर गौतम जांभुळे असे बँक मॅनेजरचे नाव आहे.

वर्धा जिल्ह्याचा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळं शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा हा वाढतच जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव खरपे यांच्या कुटुंबियाने वर्ध्यात केली होती. त्यानंतर सुरू झालेले सत्र अजूनही थांबलेले नाही.

शेतक-यांच्या आत्महत्येला आजवर कधी बँकेला जबाबदार धरल्याच अद्याप तरी कुठे नोंदविल्या गेले नाही. पण, वर्ध्यातील वडनेर येथील शेतक-याच्या आत्महत्येला जबाबदार धरून बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बँक ऑफ इंडियाच्या ही सर्वाधिक शाखा असल्याने जिल्ह्याची लीड बँक आहे. याच बँकेच्या मॅनेजर गौतम जांभूळे यांनी यांचावर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातल्या वडनेर इथल्या गणपत वासुदेव भोरे यांनी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. साडेचार एकर शेती, पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा त्यांचा संसार. मागील वर्षी त्यांच्या मुलीचं लग्न झालं. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचं दीड लाख रुपयांच, ग्रामशक्ती या खासगी फायनान्स कंपनीच तीन लाख रुपये तसच नातलग आणि इतरांचे दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. याच विवंचनेतून आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे.

आत्महत्या थांबणारी योजनाच...पण बँकेचा बेताल कारभार.....

सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली. त्याचा लाभ त्यांच्या दोन भावांना मिळाला. आज ना उद्या आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळेल. शेतात पिकवून खासगी तसचं बँकेच कर्ज फेडू, या अपेक्षेत ते दिवस काढत होते. पण, बँकेतून कर्जमाफीची लक्षण दिसत नव्हते. कर्जाचा वाढता डोंगर पाहून हताश झालेल्या गणपत भोरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

बँक म्हणते 900 रुपयांचे पत्र फरवरीत 2018 ला दिले.....
गणपत यांच्या आत्महत्येला बँका, सरकारचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे चुलत भाऊ राजेंद्र भोरे यांनी केला आहे. घटनेच्या अगोदरपर्यंत गणपत भोरे यांनी बँकेत चकरा मारल्या. पण, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आत्महत्येनंतर चौकशीस आलेल्या अधिका-यांपुढं बँकेच्या अधिका-यांनी कर्जमाफीकरीता ९०० रुपये किस्त भरावी लागत असल्याचं पत्र फरवरी 2018 मध्ये गजानन भोरेंना दिल्याच सादर करत आहे. असे असले तरी केवळ 900 रुपयासाठी ही आत्महत्या झाली नाही. मृतक गणपत यांच्या दोन्ही भाऊ यांनी बँकेच्या व्याजापोटी 36 ते 38 हजार भरले. हाच तगादा गणपत यालाही लावला. सुरवातिला कर्जमाफी आली नसल्याचे सांगितले. बँकेत चकरा मारणार माणूस केवळ 900 रुपये नाही म्हणून आत्महत्या करू शकत नाही असा सवाल कुटुंबीयांनी केला. जेव्हा की खाजगी कर्जाचे 8 हजार रुपयांची किस्त दर महिन्याला भरत असल्याचे सुद्धा कागदोपत्री सिद्ध झाले. यामुळे बँकेचा तगादा आणि योग्य समुपदेशन न केल्याने ठोस पाऊल उचलल्याचे पुढे येत आहे. कुटुंबियांसह वडनेरचे माजी सरपंच विनोद वानखडे यांनी सुद्धा बँकेला आणि शासन जवाबदार असल्याचे सांगितले.

शेतकरी गजानन भोरेंनी ९०० रुपयांकरीता आत्महत्या केल्याची बातमी मंत्रालयात पोहोचली अन सरकार खडबडून जागी झाली. जाग आली. सरकारनं तातडीन चौकशीचे आदेश दिलेत. मंत्रालयातून आदेश धडकताच जिल्हाधिका-यांनी स्वत: भोरे यांच्या घरी भेट देत चौकशी केली. सोबत उपविभागीय अधिकारी, बँकेचे अधिकारीही होते. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिका-यांनी प्रकरणाची चौकशी केली. बँकेच्या व्यवस्थापकांच्या असंवेदनशिलपणामुळं भोरे यांना कर्जमाफीचा लाभ वेळेवर मिळाला नाही. यामुळें मानसिक संतुलन ढासळले. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला. सोबतच बँकेच्या अधिका-यांनी त्यांना कर्जाचे ३८ हजार रुपये भरायला सांगितले असल्याची शक्यता उपविभागीय अधिका-यांनी वर्तवलीय. उपविभागीय अधिका-यांच्या अहवालावरून वडनेर पोलिसांनी शाखा व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हा दाखल केल्याचे हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी इटीव्हीला सांगितले.

शेतकरी राब राब राबतो... कधी निसर्ग तर कधी सुलतानी कारभार त्याला वेठीस धरतो. उत्पादनाला भाव नाही मिळाला म्हणून तर निसर्गाने अवकृपा केली म्हणून आर्थिक विवंचनेत पडतो आणि पुन्हा नव्या जोमाने उभा होतो. पण कधीतरी या दुष्टचक्राला तोडताना हताश होतो. यातूंच तो टोकाची भूमिका घेत आयुष्य संपवतो. याला एकच कारण जवाबदार आहे असे नाही. पण, जरा जरी शेतकऱ्यांना प्रति संवेदना प्रत्येकाने जपायाला सुरवात केली तर गणपत सारखे जीव जाणार नाही, उलट हे थांबवण्यास नक्किच मदत होऊ शकेल यात शंका नाही.

बाईट - वर्षा भोरे, पत्नी गणपत भोरे, रा. वडनेर, जि. वर्धा.
बाईट - किशोर भोरे, भाऊ, रा. वडनेर, जि. वर्धा.
बाईट- राजेंद्र भोरे, चुलत भाऊ
बाईट विनोद वानखडे, माजी सरपंच
बाईट- चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.