ETV Bharat / state

वर्ध्यात बैलगाडीला कार धडकली; महिलेचा मृत्यू, तिघे जखमी - car Bullock cart accident wardha

सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात तीनही जखमींवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावंगी पोलीस करत आहे.

बैलबंडीला कार धडकली
बैलबंडीला कार धडकली
author img

By

Published : Sep 27, 2020, 10:40 PM IST

वर्धा- पुलगाव-वर्धा मार्गावरील धोत्रा शिवारात भरधाव कारने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात बैलगाडीवरील २ मजूर जखमी झाले असून एका मजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच, कार चालकही जखमी झाला आहे.

तीनही मजूर बैलगाडीसह पुलगाव-वर्धा मार्गाने धोत्रा गावातील शेतकरी सुशील हावरे यांच्या शेतात जात होते. याच मार्गावरून नागपूर येथील मुकेश भास्कर हे कारने (क्र. एमएच ४९ एफ- ०२४२) प्रवास करत होते. दरम्यान, त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार बैलगाडीला धडकली. या अपघातात बैलगाडी चालक नरेंद्र बुरबुरे (रा. धोत्रा), महिला मजूर माया बुरबुरे, लता धनवीज तिघेही जखमी झाले. यात कार चालक मुकेश भास्करसुद्धा जखमी झाले. जखमींना लागलीच सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात माया बुरेबुरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, सावंगी येथील आचार्य विनोबा भागे ग्रामीण रुग्णालयात तीनही जखमींवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावंगी पोलीस करत आहे.

हेही वाचा- पर्यटन दिन विशेष: सेवाग्राम आश्रम कोरोनाच्या विळख्यात; पर्यटन खोळंबले, ४० लाखाचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.