वर्धा - देशभरात शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यात आले आहे. यात वर्ध्यातही बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात बाजारसमिती वगळता शहरात काही प्रतिष्ठाने बंद तर काही प्रमात खुले असल्याचे चित्र दिसून आले आहे.
मोर्चात सामाजिक संघटना
बंदला समर्थन देत शहरातील विविध संघटनांनी बैठक घेत आज बंद ठेवत मोर्चा काढणार असल्याचे आवाहन केले आहे. यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात मोर्चा हा शिवाजी चौकातून काढला जाणार आहे. सामाजिक संघटना यात सहभाग नोंदविणार आहे.
सातही बाजारसमिती बंद
महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाने आणि बाजारसमिती कर्मचारी संघाने बंदला पाठिंबा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सातही बाजार समितीने सहभाग नोंदवला आहे. याअंतर्गत भाजी बाजार, कापूस, सोयाबीन, धान्य विक्री पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.