वर्धा- भेटायला न आल्यास आत्महत्येचे धमकी देत युवतीला हॉटेलवर बोलावून अतिप्रसंग केल्याची घटना वर्ध्यात घडली. वर्ध्यात खासगी बँकेत कार्यरत असणाऱ्या युवतीला नात्यातील उस्मानाबादच्या युवकाने फूस लावली. मात्र आता लग्नाला नकार दिल्याने लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिसात युवतीच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अत्याचाराचे घटनास्थळ हे वर्ध्यातील हॉटेल असल्याने हा गुन्हा वर्धा पोलिसांकडे सोपवण्यात आला. वर्धा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यात मुलीच्या कुटुंबीयांनी पीडितेला वर्ध्यातून मूळ गावी लातुरला नेले. यावेळी त्या युवकाला लग्नासाठी विचारपूस केली असताना लग्नास नकार दिला. त्यामुळे युवतीला लग्नाचे आमिष देत फसवणूक करत अत्याचार केल्याचे लक्षात आले. यावरून लातूरातील एमआयडीसी पोलिसात तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पण अत्याचारातील घटना स्थळ वर्ध्यातील हॉटेल असल्याने तपास वर्धा पोलिसांकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी अत्याचाराचा घटनेची नोंद करत चौकशी सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी ईटीव्ही भारताला दिली आहे.