वर्धा - आर्वीचे प्रथम नागरिक असणाऱ्या नगराध्यक्षांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे शहरात 3 दिवस संचारबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिले आहेत. नगराध्यक्षांना व्यवस्थित वाटत नसल्याने त्यांनी स्वतःला आयसोलेशन करून घेतले होते. आज आणखी एका वीज वितरणच्या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांना सावंगी रुग्णलयात उचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वर्ध्यातील आर्वीचे प्रथम नागरिक असलेले नगराध्यक्षांना 29 जूनपासून कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे वाटत होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला घरातच आयसोलेशन करुन घेतले होते. यादरम्यान त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना आज (सोमवार) उपचारासाठी सावंगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वतःला घरातच आयसोलेशनमध्ये ठेवल्याने कुटुंबीय संपर्कात आले नसले, तरी खबरदारी म्हणून त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. प्रशासनाने ते राहत असलेल्या परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे.
नगराध्यक्ष होते टास्क फोर्समध्ये सहभागी....
आर्वी शहरातील नगराध्यक्ष हे संचारबंदी लागू झाल्यापासून उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्यासोबत संसर्ग रोखण्यासाठी बैठका घेत होते. त्यांनी जनजागृती संदेश देऊन प्रशासनासोबत फिरून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले होते. एवढेच काय उपजिल्हा रुग्णालयात चेहऱ्याला मास्क लावून ओळख न दाखता स्टिंग ऑपरेशन केले होते. तसेच शहरात हँड वॉश सेंटर मशीन लावून उपाययोजना केल्या आहेत.
नगराध्यक्षांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका फेल....
आर्वीतून वर्ध्याच्या सावंगी कोरोना रुगणलायत उपचारासाठी नेत असताना त्यांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत बिघाड झाला. यामुळे दुसरी रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील प्रवास करावा लागला.
प्रकृतीवरून अफवांचा बाजार
नगराध्यक्ष हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती पसरताच शहरातील चौका चौकात चर्चा रंगू लागली. यात त्यांची प्रकृती बिघडली असल्याचीही चर्चा आहे. शिवाय ते बाहेर जिल्ह्यात गेले असेही ऐकायला मिळत आहे. पण त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला असता त्याची प्रकृती ठणठणीत आहे. आता सर्दी ताप ही लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. तीन दिवस असलेल्या संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ते शहराबाहेर गेले नसल्याची टास्क फोर्सची माहिती....
ते मागील 15 दिवसात कुठेही बाहेर गेले नसल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली. हे अद्याप कळू शकले नाही. पण या दरम्यान त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला.