ETV Bharat / state

तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही सांगा; स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल - दादाराव केचे वर्धा प्रचार सभा

ज्यांनी देशातील गरिबांना लुटण्याचे पाप केले, तेच लोकतंत्राच्या गोष्टी करत आहेत. तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही राहुल गांधींनी सांगावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. आर्वी येथे भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:21 AM IST

Updated : Oct 19, 2019, 10:57 AM IST

वर्धा - आज काँग्रेसचे अनेक भ्रष्ट नेते कारागृहात आहेत. ज्यांनी देशातील गरिबांना लुटण्याचे पाप केले तेच लोकतंत्राच्या गोष्टी करत आहेत. तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही राहुल गांधींनी सांगावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली आहे. आर्वी येथे भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

आर्वीच्या सभेत स्मृती इराणींची राहुल गांधींवर टीका
स्मृती इराणी यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलत त्यांनी उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळवला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ५५ वर्षे राज्य करणारी काँग्रेस इतक्या वर्षात ना शौचालय देऊ शकले ना सिलेंडर. ते मोदींवर टीका करतात. ज्या राजकुमाराच्या आईने चुलीवर स्वयंपाक केला नाही, त्यांना आईचे दुःख कळणार नाही. आज गरीब कुटुंबातील माणूस पंतप्रधान झाला हे काँग्रेसला सहन होत नाही, असे म्हणत त्यांनी गांधी घराण्यावर निशाणा साधला.

हेही वाचा - भाजपच्याच शेतकरी कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - राहुल गांधी

यावेळी मंचावर माजी खासदार विजय मुळे, माजी आमदार दादाराव केचे, भाजपचे सुधीर दिवे, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते. सुधीर दिवेंसह दादाराव केचे यांनीही नागरिकांना संबोधित केले.

Intro:वर्धा-

mh_war_arvi_smruti_irani_sabha_vis1_7204321

तुमच्या जावायानी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हे ही सांगा राहुल गांधीना सवाल - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

वर्धा - नरेंद्र मोदींनी 15 लोकांची मदत केली आहे असा प्रश्न करणारे राहुल गांधी हे सज्जन यांना लाज वाटायला पाहिजे, त्याच्या जिजाजीने किती शेतकऱ्यांची जमीन लुटली आहे, हे सांगा अश्या म्हणाल्यात. आज अनेक काँग्रेसचे भ्रष्ट नेते कारागृहात आहेत. ज्यांनी या देशाला लुटले ते आता त्यांनी गरिबांना लुटण्याचा पाप केले आहे असे सांगत हे लोक तंत्राच्या गोष्टी करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा भाजप नेता स्मृती इराणी यांनी केली.

त्या आर्वी येथे आयोजित सभेत बोलत होत्या. भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या. एक अंगी प्रचार सभा वाटत असली तरी राहुल गांधी यांची झालेली प्रचार सभेचे उत्तर देत स्मृती इराणी यानी चांगलाच समाचार घेतला.

भाषणाची सुरवात भाजप नेत्या स्मृती इराणी मराठीत केली. हिंदी मराठी बोलत त्यांनी राहूल गांधींवर टीका करत चांगला प्रतिसाद मिळवला. यावेळी 55 वर्ष राज्य करनारे काँग्रेसचे राहुल गांधी इतक्या वर्षात ना शौचालय ना सिलेंडर देऊ शकले तव नेतृत्वाची गोष्ट करत मोदींनावर टीका करतात. ज्या राजकुमारच्या आईने चुलीवर स्वयंपाक केला नाही, त्यांना काय कळणार आईचे दुःख असे म्हणत टीका केली. आज गरीब कुटुंबातील पंतप्रधान झाल्याचे दुःख काँग्रेसला सहन होत नसल्याचेही म्हणाल्या. आर्वीत सभा घेऊन 15 मिनटाचे भाषण करणारे खोटारड्या गोष्टी सांगत राजनीति करणारे त्यांचे ससंस्कार असल्याची टीका केली.

यावेळी मंचावर माजी खासदार विजय मुळे, माजी आमदार दादाराव केचे, भाजपचे सुधीर दिवे, राहुल ठाकरे, संदीप काळे विजय वाजपेयी विनय डोळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदुरकर आसावरी देशमुख हाजी गफार अनिस भाई आदी प्रमुख अतिथी होते
यावेळी सुधीर दिवे दादाराव केचे यांनीही नागरिकांना संबोधित केले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.