ETV Bharat / state

वर्धा : आर्वीतील महिला कृषी सहाय्यकला कोरोनाची लागण - corona numbers in wardha

25 जूनला ती पुण्याहून परतलेल्या आर्वी येथील कृषी विभागाच्या 36 वर्षीय महिला कृषी सहाय्यक यांना कोरोनाची लागण झाली आहे. तिला सेवाग्राम येथील कस्तुरबा गाडी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर, या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

आर्वीतील महिला कृषी साह्यक कोरोना पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jul 3, 2020, 3:41 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील आर्वी येथे कार्यरत कृषी विभागाच्या 36 वर्षीय महिला कृषी सहाय्यक यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. ही महिला 25 जूनला पुण्याहून परत आली होती. तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली.

ही महिला रुग्ण 11 जूनला पुण्यातील थेरगाव येथे लग्नासाठी गेली होती आणि 25 जूनला ती पुण्याहून परतली. 26 जूनला तिला गृह विलगीकरण करण्यात आले. दरम्यान, ताप, खोकला अशी लक्षणेही तिच्यात दिसून आली. यामुळे तिला 30 जूनला आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. 1 जुलैला तिची स्वॅब चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून यामध्ये ही महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला सेवाग्राम येथील कस्तुरबा गाडी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर, या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

या रुग्णासह जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 18 झाली आहे. यात आतापर्यंत 12 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या कोरोना केयर रुग्णालयात 5 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जिल्ह्यात गुरुवारीसुद्धा एक रुग्ण आढळून आला होता. मागील आठवड्याभरात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने काळजी घेण्याची आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.