वर्धा - नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एटीएम मशीन चोरीला गेल्याची घटना ताजी आहे. असे असताना आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) ते कोंढाळी मार्गावरील ढगा शिवारात एटीएम मशीन फेकलेल्या अवस्थेत आढळले. मात्र, हे मशिन नेमके कोणत्या एटीएमचे आहे याचा शोध अजून लागला नाही.
ढगा फाट्यावरील रस्त्यालगतच्या गड्ड्यात एटीएम मशीन फेकलेली असल्याचे आढळून आले. हा भाग रस्त्यापासून बराच आतमध्ये आहे. याची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच, घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. खरांगणा ते कोंढाळी मार्गावर ढगा (भूवन) पाटीजवळ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचार्यांसह मशिन जप्त केली. यावेळी वनविभागाचे मासोद येथील सहवनक्षेत्र अधिकारी प्रवीण डेहनकर, चव्हाण आदी उपस्थित होते.
हेही वाचा - डॉ. रुपा कुलकर्णी : असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी सावित्रीची लेक
ढगा फाट्यावर मिळालेले एटीएम मशीन एनसीआर कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात ही कंपनी नेमकी कोणत्या बँकेला मशीन पुरवतात, याचा तपास करावा लागणार आहे. वर्धा आणि नागपूर येथे आधीही एटीएम मशीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. हे मशीन त्या चोरी केलेल्या मशिनींपैकी नसल्याचे खरंगण्याचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
एटीएम मशीन चोरीचा नवा ट्रेंड -
पूर्वी एटीएम फोडीच्या घटना घडत. याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. मात्र, सध्या एटीएम मशीनच्या चोरी करण्याचा नवा ट्रेंड अशा घटनांमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे या घटनेतही चोरट्यांनी कुठेतरी एटीएम मशिन चोरली. त्यातील रक्कम काढून घेतली असावी आणि त्यानंतर मशिन फेकून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.
हेही वाचा - ठाण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सावित्रीबाईंचे मुखवटे लावून आंदोलन; 8 तारखेपासून देशव्यापी संप
नव्या वर्षातील पहिला गुन्हा एटीएम मशीन चोरीचा दाखल -
वर्ध्यातील सेवाग्राम पोलीस ठाण्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मशीन चोरून नेली. या टाटा इंडिकॅशचे एटीएम अशाच्या पद्धतीने चोरण्यात आले. याच रात्री नागपूरसह काही भागात अशाच पद्धतीने मशीन चोरी केल्याची घटना घडल्या आहेत.