ETV Bharat / state

अज्ञात वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार - अज्ञात वाहनाची धडक

मृताचे नाव भोजराज महादेव रमधम (३१) असे आहे. जखमीचे नाव नरेश डोंगरे असून त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात दुचाकीस्वार ठार
author img

By

Published : Feb 12, 2019, 3:57 PM IST

वर्धा - जिल्ह्यातून जात असलेल्या नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सावळी (खुर्द) फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. अपघात सायंकाळी ७ च्या सुमारास झाला असून यात दुचाकीस्वार ठार झाला. मृताचे नाव भोजराज महादेव रमधम (३१) असे आहे.

अपघातात दुचाकीस्वार ठार
undefined

यावेळी भोजराजसोबत आणखी एकजण दुचाकीने येनगावमध्ये जात होता. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भोजराज महिंद्रा फायनान्स कंपनीत काम करत होता. कर्ज वसूलीला जात असताना त्याचा अपघात झाला. जखमीचे नाव नरेश डोंगरे असून त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील १५ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अन्य एक व्यक्ती सायंकाळी काम संपवून घरी येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात, दुचाकीस्वार ठार एक जखमी

राष्ट्रीय महामार्गवरील घटना सावळी (खुर्द) फाट्यावरची घटना

कारंजा (घा) राष्ट्रीय महामार्ग साहच्या सावळी (खुर्द) फाट्यावर सोमवारच्या सायंकाळी 7 वाजता सुमारास अपघात घडला. दुचाकीस्वार दोघे जण जात असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. भोजराज महादेव रमधम वय 31 अस मृतकाचे नाव आहे. हा महामार्ग दुचाकी धारकांसाठी रात्र होताच कर्दनकाळ ठरत आहे.

भोजराज हा कारंजा तालुक्यातील येनगावमध्ये महिंद्रा फायनान्स कर्ज वसुलीचे काम करत होता. नेहमीप्रमाणे कर्ज वसुलीचे काम पूर्ण करत घराकडे परत जात होता. याचवेळी सावळी खुर्द फाट्यावर अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. वाहनाने दुचाकी क्र MH 31 CZ 7934 हिला धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. यात भोजराज रमधम हा जागीच ठार झाला तर नरेश डोंगरे वय 27 रा लिंगा मांडवी जखमी झाला दोघांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यात एकाला मृत घोषित केले तर दुसऱ्यावर उपचार सुरू करण्यात आले.

मागील 15 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक इसम सायंकाळी काम आटोपून घरी जात होता. यावेळी त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या मार्गावर दिवसा होणारे अपघात नवीन नाही. मात्र सायंकाळी भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांची गती रस्त्या लगतचे गावं येतांना तशीच राहते. अचानक कोणी रस्त्यात अलेकी की त्याला धडक बसताच जिवाने जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
Body:पराग ढोबळे वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.