वर्धा - आचार्य विनोबा भावे यांनी 'जय जगत' नारा देत प्रत्येकाला समानतेच्या नजरेतून पाहणारा दृष्टीकोन मांडला. केवळ विचार मांडून न थांबता स्वतःपासून अंमलबजावणी करणारे संत म्हणजेच आचार्य विनोबा भावे. त्यांनी जीवनात अध्यात्माला विज्ञानाची जोड अशी शिकवण दिली. तेच भूदान चळवळीचे प्रणेते जगाला ओळख झाली. पण केवळ भूदानच नाही तर विन्या ते विनोबा...संत विनोबा हा त्यांचा प्रवास खास राहिलाय. भूदानाव्यतिरिक्त त्यांच्या जीवनातील काही पैलू नक्कीच वेगळ्या विनोबाजींची ओळख करून देतात.
विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे. कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या गागोदे या गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांनी शाळेत जाताना त्यांची आई रुक्मिणी त्यांनी वेगवोगळ्या गोष्टी सांगत असे. आईने ब्रह्मचर्य पाळणार की कुटुंब चालविणार असे विचारल्यावर त्यांनी आईला त्यावर प्रतिप्रश्न केला. याच्या आईने दिलेल्या उत्तराने त्यांचे जीवन बदलून गेले. जीवन बदलवणारे जे उत्तर होते तेही तेवढेच प्रभावी होते. कारण या उत्तराचा प्रभाव केवळ विनोबांच्या जीवनावरच नाही तर त्यांच्या माध्यमातून अनेकांचे जीवन बदलवणारा ठरला. ते उत्तर असे होते "कुटुंब चालवले तर एका पिढीचा उद्धार होईल. मात्र ब्रह्मचर्याचे पालन केले तर 42 पिढ्यांचा उद्धार होईल." त्यांना वयाच्या 10 व्या वर्षी आईकडून अशी शिकवण मिळाली.
हेही वाचा - वन्यप्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वर्ध्यात भरली जंगल परिषद
यानंतर एके दिवशी त्यांनी शाळेचे प्रमाणपत्र पाणी तापवताना जाळून टाकले. यावर त्यांना आईने प्रश्न केला तू हे महत्त्वाचे कागद पत्र का जाळतो आहेस? ते कागदपत्र कधी तरी कामी येईल. यावर ते विनोबा म्हणाले ज्या मार्गाने जायचे नाही त्याचा दोरच कापून टाकायचा असे सांगत आयुष्यभर ब्रह्मचर्य पालनाचा निर्णय घेतला आणि त्याधारावर जीवन व्यतीत केले.
विनोबांना महात्मा गांधींचे शिष्य मानले जाते. पण त्याची भेट पहिल्यांदा कशी झाली त्याचाही एक प्रसंग आहे.
15 मार्च 1916 मध्ये विनोबा भावे बनारसला पोहोचले मूळचे कोकणातले असून त्यांनी कुटुंब बडोद्यात राहायला आले होते. बनारसमध्ये राहून संस्कृत तसेच वेदांचा अभ्यास करावा हा त्यांचा उद्देश होता. याचदरम्यान विनोबांनी महात्मा गांधींना पत्र पाठवून काही प्रश्न विचारले. महात्मा गांधींनी सुद्धा त्यांना तत्काळ उत्तर पाठवले. तसेच पुढील पत्रात महात्मा गांधींनी विनायक भावे यांना चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करत विनायक भावे 7 जून 1916 रोजी कोचरब येथील सत्याग्रही आश्रमात पोहचले. विनोबा हे अगोदरच गांधींजींच्या भाषणांपासून प्रभावित होते. विनायक नरहरी भावे या तरुणाला भेटून गांधीजींनी विविध विषयावर चर्चा केली. पहिल्या भेटीतच विनायक नरहरी भावे यांनी स्वतःला त्यांचे शिष्य झाल्याचे सांगितले जाते. याच भेटीत गांधीजींनी त्यांचे 'विनोबा' असे नामकरण केले. महाराष्ट्रातील तुकोबा, चोखोबा यांच्याप्रमाणे तू विनोबा झालास, असे गांधीजी म्हणाले.
1940 पर्यंत विनोबांना मोजकेच लोक ओळखत असत. पण 5 ऑक्टोबर 1940 रोजी महात्मा गांधीजींनी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची ओळख सर्वांना करून दिली. पुढे भूदान चळवळमधून ते अधिक प्रकाश झोतात आले. भूदानने देशभर ओळखले जाऊ लागले.
हेही वाचा - वर्ध्यात पक्षी सप्ताह बहरला; पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग
विनोबा भावे यांनी अखंड सूतकताई करत सूतकताईचे अर्थशास्त्र सांगितले. हे सांगताना स्वतः त्यात झोकून देत त्यातून होणारे शोषण गांधीजींना सांगितले. नंतर सुतकताईच्या मजुरीत वाढ करण्यात आली. याचे श्रेय विनोबाजींना आहे. यासाठी त्यांनी संपूर्ण अर्थशास्त्र समजून घेतले. गांधीजींना विनोबा आणि नेहरू सर्वात प्रिय होते. पण गांधीजींच्या जिवंतपणी हे दोघे एकमेकांना कधीही भेटले नव्हते. गांधीजींच्या मृत्यूनंतर 1948 ला सेवाग्राम येथे कार्यक्रमात ते दोघे भेटले.
विनोबांनी वेगवेगळ्या धर्मग्रंथाचा अभ्यास करत त्याचे सार हिंदीत अनुवादित केले आहे. सोबतच विनोबांनी महाराष्ट्रातील संत साहित्याचाही अभ्यास केला. त्यांनी शिक्षणावर आपल्या मताची मांडणी केली.
विनोबांचा शिक्षण पद्धतीवर अभ्यास होता. त्यांना शिक्षण असे असावे की त्यामधून विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्य असावे, असा त्यांच्या दृष्टीकोन होता. या अभ्यासातून बाहेर पडताच हाताला काम करणारे कौशल्य असण्याला भर द्यावे हा उद्देश होता. योग उद्योग आणि सहयोग या तीन गोष्टीचे एकत्रीकरण म्हणजे 'शिक्षण' असे सूत्र त्यांनी दिले. आज स्किल डेव्हलपमेंटवर शासनाकडून विशेष भर दिला जात आहे. तसेच, या अनुषंगाने कोणकोणते पर्याय अवलंबता येतील, याचाही विचार होत आहे. विनोबांनी ही दूरदृष्टी त्या काळातही होती.
त्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग आईकडून मिळाला होता. यामुळे गुरूंना किंवा कोणाला वरदान मागायचे झाले तर आईच्या हातून शिक्षण मिळावे हेच वरदान मागावे, त्यांनी सांगितले. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी महिला शिक्षकच असाव्यात, असे त्यांचे विचार होते. यामुळे मुलांवर अधिक चांगले संस्कार होऊन त्यांचा जीवनाचा पाया मजबूत होईल, असे ते म्हणत असत.
हेही वाचा - अन्....'त्या' प्राण्यांनी पिंजरा सोडून जंगलात धाव घेतली
विनोबा यांचा आहार शास्त्रावर विशेष अभ्यास होता. तसेच ते निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करत उपचार करत असत. वयानुसार त्यांना पोटात अलसर झाला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो अमान्य करत आहार शास्त्रावर असलेला अभ्यासातून काही निवड केली. यात त्यांनी उपचार शोधला दूध आणि गुळाची स्लरी घेऊन पुढील आयुष्य जगले. 15 नोव्हेंबर 1982 ला त्यांचा आजाराने मृत्यू झाला. पण तोपर्यंत त्यांनी हाच आहार घेऊन आयुष्य जगले. दूध आणि गुळाची स्लरी हा आहार निवडताना 'आहार शास्त्रातील आजार वाढू न देण्यासाठी' केलेल्या अभ्यासातून त्यांनी याची निवड केली होती.
विनोबांकडे पाहताना भूदान चळवळ हे महत्वाचे काम असले तरी त्यांच्या जीवनातील अनेक पैलू तेवढेच म्हत्वाचे आहे. आज पुण्यतिथी निमित्त हजारोंच्या संख्येने मैत्री मिलन या निमित्त आलेले हे लोक त्यांचा जीवनातील संदेश पुढच्या पिढीला पोहोचविण्यासाठी देशाच्या कानाकोपरात जाऊन पोहचले आहे.