वर्धा - येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात 6 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर या विद्यार्थ्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
![6 students suspended due to Violations of the Code of Conduct in wardha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4723667_278_4723667_1570809061159.png)
हेही वाचा - जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना थारा देऊ नका, प्रणिती शिंदेंचे मतदारांना आवाहन
या विद्यार्थ्यांनी कांशीराम यांची जयंती साजरा करण्याची तसेच पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची अर्ज करत परवानगी मागितली होती. मात्र, विद्यापीठाने ती परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांवर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप या अनुषंगाने सामूहिक धरणे आंदोलन केल्याचा ठपका लावण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच अखिल भारतीय दलित लेखिका मंच नवी दिल्ली, संबुद्ध महिला संघटना यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनात पुढे येत निलंबन मागे न घेतल्यास आंदोलन करण्यासह न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.