वर्धा- समुद्रपूर तालुक्यातील सावंगी झाडे येथे आज पोथरा नदीत बुडून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. तो गौरी पूजेसाठी बहीनसोबत जाण्याच्या हट्ट करीत होता. मात्र पूजेसाठी गेले आसता त्याचे पोथरा नदी पात्रात पाय घसरुन पडल्याने बुडून मुत्यू झाला. कृष्णा रवींद्र उसरे असे १२ वर्षीय मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
गौरी पुजे दरम्यान मोठ्या प्रमाणात महिला गौरी शिरविण्यासाठी नदीकाठावर जातात. यावेळी आपली मोठी बहीन तनश्री ही आपल्या मैत्रिणीसोबत नदीवर जात असल्याचे कृष्णला समजले. यामुळे कृष्णाने आईकडे नदीवर जाण्याचा हट्ट धरला. त्याच्या आईने त्याला जाण्याची परवानगी दिली. मात्र, नदीत उतरू नको अशी ताकीद देखील दिली होती. दरम्यान तनश्री आपल्या मैत्रिणीसोबत पूजा करीत होती. त्यावेळी नदी काठावर उभा असलेला कृष्णा नदी पत्रात पडला. यावेळी लोक मदतीला धावले. मात्र नुकतेच नदीचे खोलीकरण झाले होते. त्यामुळे नदीत गाळ जमा झाला होता. त्या गाळात कृष्णा अडकला.
त्याला पोहता येत असतांना देखील तो गळातून बाहेर पडू शकला नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. अखेर एक तासाने त्याचा मृतदेह हाती लागला. त्याला बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती पोलीस पाटील समीर धोटे यांनी समुद्रपूर पोलिसांना दिली. कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद समुद्रपूर पोलिसांनी केली आहे.