NCP Leader Eknath Khadse Video : जबाबदारी प्रशासनावर सोपवून आज संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर; एकनाथ खडसेंची शिंदे सरकावर टीका - MLA Eknath Khadse has Criticized
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते ( NCP Leader Eknath Khadse ) तथा विधान परिषदेचे आमदार ( Legislative Council MLA ) एकनाथ खडसे यांनी यावल ( Yaval ) येथे आपल्या कार्यकर्त्यांना भेट दिली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, खरंतर हीच वेळ आहे की, राज्य सरकारने या संकटाच्या काळात मदतीची घोषणा करायला पाहिजे. मात्र, आज संपूर्ण महाराष्ट्र हा वाऱ्यावर असून, महाराष्ट्राची जबाबदारी ही प्रशासनावर सोपवून दिलेली आहे. संबंधित खात्याचे मंत्री राज्यमंत्री नसल्यामुळे राज्यात अवघड परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. आमच्या कार्यकाळात पुरामध्ये ( Flood Conditions ) वाहून गेलेले नागरिक असो व जनावरांचे घरांचे नुकसान असो आम्ही तत्काळ मदत द्यायचो. मात्र, सद्यःस्थितीत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाचे अधिकारी आपल्या चौकटीत व नियमात असेल ते कारवाई करू शकतात. मात्र, लोकप्रतिनिधी हा अधिक प्रभावीपणे समस्या मांडू ( Public Representative Problem Can Raise ) शकतो. मात्र, दुर्दैवाने आज राज्यात ही परिस्थिती नसल्याचे मतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे