नागपूर - विधानसभा निवडणुकीत यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मुखमंत्री विरोधात ठोस उमेदवार काँग्रेसतर्फे देणे गरजेचे आहे, अन्यथा निकालात परिणाम दिसतील. त्यामुळे नागपूरच्या पक्षश्रेष्टींनी बैठक घेऊन निर्णय घ्यावे, असे मत माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे.
आचारसंहिता लागल्यावर काँग्रेसची लगबग सुरू झाली आहे. प्रचाराला कमी वेळ मिळणार असला तरी आमची तयारी झाली असल्याचे राऊत यांनी सांगितले. सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. नागपुरात सर्व ज्येष्ठ नेते एकत्र बसून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार देणे महत्वाचे आहे. कोणालाही तिकीट मिळो प्रत्येकाने पक्षाचे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील काँग्रेस मधील गटबाजी ही जगजाहीर आहे. याचा फटका देखील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला. त्यामुळे याची पूनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेणे काँग्रेसला जास्त महत्वाचे आहे.
हेही वाचा - नागपूर पालिकेतील ४ हजार कंत्राटी कामगार होणार कायम, निवडणुकीच्या तोंडावर शासनाचा निर्णय