ETV Bharat / state

परभणीत आणखी 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू ; एकूण बळींची संख्या 16 तर गेल्या 24 तासांत 43 रुग्णांची भर - परभणी कोरोना लेटेस्ट न्यूज

परभणी शहर आणि पूर्णा येथील दोन कोरोनाबाधित वृद्धांचा मृत्यू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 16 वर गेली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 448 झाली आहे.

परभणी कोरोना अपडेट
परभणी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 22, 2020, 1:24 PM IST

परभणी - आज (बुधवारी) परभणी शहर आणि पूर्णा येथील दोन कोरोनाबाधित वृद्धांचा मृत्यू झाला. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 16 वर गेली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 448 झाली असून, त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला, तर 204 जण कोरोनामुक्त झाल्याने उर्वरीत 211 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात उपचार घेणाऱ्या 75 वर्षीय वृद्धाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. ते शहरातील इक्बाल नगर येथील रहिवाशी असून, त्यांना 18 जुलैला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच पूर्णा येथील 61 वर्षीय वृद्धाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते पूर्णा येथील शास्त्रीनगर येथील रहिवाशी असून 17 जुलैला त्यांना परभणीच्या कोरोना संक्रमित कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापुर्वी त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या दोन कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे परभणी जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 16 एवढी झाली आहे.

दरम्यान, काल (मंगळवारी) परभणी तालुक्यातील शहापूरच्या 35 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदरील रुग्णास किडनी व मनक्याचा क्षयरोग हा आजार होता. ते पुण्यात नियमितपणे डायलेसीसवर उपचार घेत होते. त्यानंतर 12 जुलैला ते परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना डायलिसिसचा उपचार मिळत नसल्याने त्यांनी एक व्हिडिओ तयार करून त्यात आपली व्यथा मांडली होती. ज्यामध्ये त्यांनी 'आपले काही बरे-वाईट झाल्यास त्याला जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार राहील', असा आरोप केला होता.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात नव्या 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. ज्यामध्ये परभणी शहरातील इक्बाल नगर, टिपू सुलतान चौक, दर्गा रोड, विद्यानगर आणि सद्गगुरु नगर या ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पालम शहरातील अबूबकर कॉलनी, पूर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला आणि सेलू शहरातील विद्यानगर या ठिकाणीदेखील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. तर गंगाखेड शहरातील हटकर गल्ली येथे 7 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये 10 महिन्याच्या बालकासह 5 व 12 आणि 14 वर्षांच्या लहान मुलींचा देखील समावेश आहे. तसेच यात गंगाखेड शहरातील योगेश्‍वर कॉलनी येथील दोन पुरुष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे.

खडकपुरा गल्ली येथील 8 वर्षीय लहान मुलीसह 33 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिलेचा देखील या कोरोना बधितांमध्ये समावेश आहे. पालमच्या अबूबकर कॉलनी आणि पूर्णा शहरातील कुरेशी नगरात राहणारे दोन कोरोनाबाधित आढळले असून, त्यांच्यावर औरंगाबाद व नांदेड येथे उपचार सुरू आहेत. त्यांची नोंद मात्र परभणी जिल्ह्यात झाली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

रात्री 11 वाजता पुन्हा आलेल्या एका अहवालात आणखी 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांमध्ये गंगाखेड येथील 18 तर सेलू येथील 8, मानवत येथील 7, परभणी शहरातील 7 तसेच जिंतूर, पालम व पूर्णा शहरातील प्रत्येकी एक अशा एकूण 43 रुग्णांचा समावेश आहे.

समाधानाची बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली असून, यामध्ये परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट, सोनार गल्ली, गांधी पार्क, जुना पेडगाव रोड, जवाहर कॉलनी, एकनाथ नगर, जागृती कॉलनी, कडबी मंडई, नाथनगर, नानलपेठ आदी भागातील 13 रुग्णांचा समावेश आहे. तसेच पूर्णा शहरातील रेल्वे कॉटर येथील एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे. गंगाखेड शहरातील आंबेडकर नगर , नगरेश्वर गल्ली आणि पाठक गल्ली या ठिकाणच्या 5 रुग्णांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय सेलू शहरातील खोकसे गल्ली येथील एका बधिताला देखील सुट्टी देण्यात आली आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 164 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 514 नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर आजपर्यंत 448 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 125 रुग्णांचे अहवाल निर्णायक असल्याचे सांगून 52 जणांचे अहवाल प्रयोगशाळेने फेटाळले आहेत. याप्रमाणेच मंगळवारी दिवसभरात दाखल झालेले 45 रुग्ण असून, त्यांचा स्वॅब घेऊन तो प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.