ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आदिपुरुषमधील एका फोटोशी तुलना करत एका तरुणाने हा फोटो ट्विटरवर अपलोड केला. मुख्यमंत्र्यांची तुलना आदिपुरुषमधील फोटोसोबत केल्याने मोठी खळबळ उडाली. तरुणाच्या या ट्विटरवर ठाणे पोलिसांनी जबरदस्त दणका देत तरुणाला त्याचा नंबर मागितला असून त्याला ठाण्यात बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
Didn't know Eknath Shinde was in Adipurush 🤔@mieknathshinde#Adipurush #AdipurushTickets #AdipurushOnJune16 #AdipurushReview #SaifAliKhan pic.twitter.com/saGqpFIhEz
— Abhay 👔 (@xavvierrrrrr) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Didn't know Eknath Shinde was in Adipurush 🤔@mieknathshinde#Adipurush #AdipurushTickets #AdipurushOnJune16 #AdipurushReview #SaifAliKhan pic.twitter.com/saGqpFIhEz
— Abhay 👔 (@xavvierrrrrr) June 16, 2023Didn't know Eknath Shinde was in Adipurush 🤔@mieknathshinde#Adipurush #AdipurushTickets #AdipurushOnJune16 #AdipurushReview #SaifAliKhan pic.twitter.com/saGqpFIhEz
— Abhay 👔 (@xavvierrrrrr) June 16, 2023
काय आहे प्रकरण : भगवान राम आणि रामायणावर आधारित आदिपुरुष या चित्रपटाची सध्या सगळीकडे धूम सुरू आहे. यामध्ये रावण आणि हनुमानाच्या भूमिकाही लक्षवेधक आहेत. मात्र ट्विटरवर अभय नावाच्या तरुणाने आदिपुरषमधील एका फोटोसोबत तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबत केली आहे. दोन्ही फोटो एकत्र करुन या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदिपुरुष या चित्रपटात होते, याबाबत माहिती नव्हते, असे कॅप्शन दिले आहे. मात्र या फोटोवरुन आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे.
ठाणे शहर पोलिसांनी घेतली दखल : ट्विटरवर मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो टाकून त्याची आदिपुरुषमधील फोटो केल्याने मोठी खळबळ उडाली. याबाबतचे ट्विट पाहताच, ठाणे पोलिसांनी याबाबतची दखल घेतली. पोलिसांनी या तरुणाला त्याचा नंबर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या तरुणावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ट्विटरवर चर्चेला आले उधाण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वि केल्यानंतर ट्विटरवर चर्चेला मोठे पेव फुटले आहे. अनेक वापरकर्त्यांनी या तरुणावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक ट्विटर वापरकर्ते पोलिसांना टॅग करुन तक्रारी करत आहेत. तर अद्यापही ट्विट डिलीट न केल्यामुळे त्या तरुणाला अल्लू अर्जुन संबोधत आहेत.