ETV Bharat / state

Knife Attack On Female : मोबाईल चोरट्याला प्रतिकार करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात चाकूने केले सपासप वार

तिघी मैत्रिणी कामावर रस्त्याने पायी चालत जात असताना एका चोरट्याने त्यांना रस्त्यात अडवून एका मैत्रिणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न (Woman attempt steal mobile phone) केला. मात्र दुसऱ्या मैत्रिणीने चोरट्यास प्रतिकार (woman resistance to thief Thane) करताच, चोरट्याने तिच्यावर भरस्त्यात नागरिकांसमोरच चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी (knife attack on woman Bhiwandi Thane) केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील काटईनाका परिसरात घडली आहे. (thief repeatedly stabbed with knife), (young woman resisted mobile phone thief)

Knife Attack On Female
तरुणीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार
author img

By

Published : Oct 31, 2022, 7:54 PM IST

ठाणे : तिघी मैत्रिणी कामावर रस्त्याने पायी चालत जात असताना एका चोरट्याने त्यांना रस्त्यात अडवून एका मैत्रिणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न (Woman attempt steal mobile phone) केला. मात्र दुसऱ्या मैत्रिणीने चोरट्यास प्रतिकार (woman resistance to thief Thane) करताच, चोरट्याने तिच्यावर भरस्त्यात नागरिकांसमोरच चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी (knife attack on woman Bhiwandi Thane) केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील काटईनाका परिसरात घडली आहे. (thief repeatedly stabbed with knife), (young woman resisted mobile phone thief )

तरुणीवर चाकूचे वार, लोकांनाही धमकावले- या प्रकरणी हल्लेखोर चोरट्या विरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमाल मोहमद अब्बास अन्सारी (२८ रा.काटई) असे हल्लेखोर चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संगिता विष्णू ओव्हळ ह्या त्यांच्या मैत्रिणी सुनिता सरोज आणि निसा खातून यांच्यासोबत रविवारी सकाळच्या सुमारास भिवंडीतील काटई नाक्याच्या डावीकडील बंद टाटा कंपनीच्या कंपाउंडच्या बाजूकडील रस्त्याने कामावर जाण्यासाठी पायी चालत जात होत्या. त्याच सुमाराला हल्लेखोर चोरटा कमालने तिघां मैत्रणीना रस्त्यात अडवून सुनीताच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र संगीताने त्यास जोरदार प्रतिकार करत विरोध केला. त्यावेळी हल्लेखोर कमालने तिला धमकावत तिच्यावर चाकूने छातीवर, पोटावर आणि हातावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तर तिच्या बचावासाठी येणाऱ्या लोकांनाही चाकूचा धाक दाखवून धमकावले आहे.

हल्लेखोरावर गुन्हा दाखल- जखमीवर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तसेच हल्लेखोरावर निजामपूरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९७,५११,५०४,५०६ अ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) अतुल लंबे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.