ETV Bharat / state

Thane Crime : ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणात अडकलेल्या तरुणाची आत्महत्या, करिअर खराब होण्याच्या भीतीने उचलले टोकाचे पाऊल - ठाणे वाहतूक पोलिसांचा छळ

ट्रॉफिक पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणात अडकल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून त्याला करिअर खराब करण्याची भीती दाखवली जात असल्याचा आरोप त्याच्याकडून करण्यात आला. मनीष उतेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागली असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

ट्रॉफिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

author img

By

Published : Jul 29, 2023, 8:57 AM IST

Updated : Jul 29, 2023, 9:35 AM IST

ठाणे : आर्मी किंवा पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाण्यातील एका तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीष उतेकर ( वय 23 ), असे या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात त्याच्यावर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर वाहतूक पोलिसांच्या कथित जाचाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली. ट्रॅफिक पोलीस त्रास देत असल्याचा मेसेज त्याने आपल्या आईला पाठवला होता. आईला मेसेज पाठवल्यानंतर तरुणाने आत्महत्या केली.

नातेवाईकांचा आरोप: ठाण्यातील वागळे इस्टेटमधील हनुमान नगर येथे मनीष उतेकर हा तरुण आपल्या आई-वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होता. वडील सिक्युरिटी गार्ड तर आई घरकाम करते. मोठा भाऊ हा रुग्णवाहिकेमध्ये चालक म्हणून काम करत आहे. मनीष उत्तेकरने हलाखीच्या परिस्थितीत बारावीपर्यंत शिक्षण केले. त्यांनतर आर्मी किंवा पोलीसमध्ये भरती होण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले होते. मात्र वाहतूक पोलिसांच्या जाचामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मनीषच्या नातेवाईकांना केला.

काय आहे प्रकरण: 16 जुलैला ठाणे वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम सुरू होती. त्यावेळी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनीष उतेकर हा कोपरी येथून आपल्या मित्रांबरोबर घरी जात होता. तेव्हा त्याने मद्यपान केले होते. वाहतूक पोलिसांच्या सुरू असलेल्या मोहिमेत मनिष सापडला. मनीषच्या शरीरात अल्कोहोलचे 176 टक्के प्रमाण आढळले. त्यानंतर मनिष उतेकरवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह' शी संबंधित कलमांतर्गत कारवाई केली. यावेळी मनिषला आपल्या करिअरबाबत भीती वाटू लागली. त्याने पोलिसांना पाया पडून विनंती केली. मात्र तुम्ही उद्या न्यायालयात हजर राहण्यासाठी, या असे पोलिसांनी सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी मनिष हा वाहतूक पोलिसांना भेटायला गेला. कृपया मला कोर्टात घेऊन जाऊ नका, मी येथेच आपली माफी मागून दंड भरतो असे मनीषने सांगितले. मात्र वाहतूक पोलिसांनी त्याला धमकी दिल्याचा आरोप त्यांने आपल्या मेसेजमध्ये केला आहे. तुझे करिअर बरबाद होईल, अशी भीती मनिषला दाखवली. आपले करिअर खराब होणार असल्याच्या भीतीमुळे मनिषने आत्महत्येचे पाऊल उचलले. दरम्यान मनिषने या घडलेल्या प्रकरणाचा मेसेज आपल्या आईला केला होता. आईला मेसेज केल्यानंतर शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

कारवाईची मागणी: या प्रकरणानंतर मनिषचे नातेवाईक आणि मित्र ठाणे वाहतूक विभागाच्या शाखेत पोहोचले. वाहतूक पोलिसांवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात अधिक तपास श्रीनगर पोलीस करत आहेत. यासंदर्भात ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी माहिती दिली की, दारू पिऊन गाडी चालवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले होते. कायद्याने त्यांना सोडणे न सोडणे हे न्यायालयाच्या आधीन आहे. आम्ही कारवाई करण्याचे काम करतो. त्यानंतरची कारवाई न्यायालय करते. त्यामुळे आम्हाला विनंती करून काहीही उपयोग नसतो. कायद्याने कोर्ट योग्य ती कारवाई करते.

ठाण्यात अवैध वाहतूक हफ्तेखोरी: ठाण्यात अनेक वर्षांपासून अवैध वाहतूक सुरू आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे असले तरी ठाण्यात अवैध व्यवसाय चालू आहेत. कारण कायद्याचे रक्षण करतेच वसुली करणारे झाले आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी केला. कोपरीमध्ये नुसती अवैध वाहतूक होत नसून आयुर्मान संपलेल्या बसेस दररोज हजारो लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. मात्र वाहतूक पोलीस आणि परिवहन विभाग त्यावर कारवाई करत नाही. त्यांना हफ्ते मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत नाही. हे चित्र अनेक वर्षांपासून सर्व ठाणेकर पाहत असल्याचा आरोप महेश मोरे यांनी केला.

हेही वाचा-

  1. College Girl Killed In Delhi : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा खून, रॉडने वार करुन मृतदेह टाकला बाकड्याखाली
  2. Satara Crime : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला २१ वर्षांनी अटक

Last Updated : Jul 29, 2023, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.