ठाणे: ज्ञानदेव पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर विशाल काशिनाथ पाटील (२१ रा.सुरई) असे बेदम मारहाणीत जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ज्ञानदेव पाटील यांचा मंडपाचा व्यवसाय आहे. त्यांची १३ वर्षीय मुलगी आणि तक्रारदार विशाल यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. त्यातच विशाल हा १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ज्ञानदेव पाटील यांच्या मुलीस भेटण्यासाठी त्यांच्या घरा नजीकच्या साई मंदिरा जवळील रिक्षा स्टँडसमोर गेला होता. त्यावेळी त्यांची १३ वर्षीय मैत्रीण त्याठिकाणी आली. यानंतर तिने मोबाईल घरी देऊन येते असे सांगून ती घरी गेली. यावेळी घटनास्थळी तिच्या वडिलांनी अन्य दोन साथीदारांसह येऊन विशालला त्या ठिकाणाहून त्यांच्या घरी नेले. त्यानंतर ज्ञानदेवने त्यास कमरेच्या पट्ट्याने पाठीवर, हातावर व डोक्यावर बेदम मारहाण केली. शिवाय मंडपाच्या जाड बांबूने डोक्यात जोरात उपट घालून गंभीर जखमी केले.
बेदम मारहाण: आरोपी ज्ञानदेवच्या अन्य दोन साथीदारांनी विशालला शिवीगाळ करत ठोश्या-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विशाल गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर तिन्ही आरोपींनी आपसात संगनमताने जखमी विशालला त्यांच्या मुलीला पुन्हा भेटल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून तिन्ही आरोपी पळून गेले. जखमी विशालच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तिघेही आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक धिवार हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात रोष व्याप्त आहे.
ठाण्यात युवकाला मारहाण: श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर चौकात या तरुणाला मारहाण करण्यात आल्याची ही घटना १२ जून,2020 ला ठाण्यात घडली होती. अमका-टमका भाई माझा बॉस आहे, असे जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मारणार, या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही मारहाण पाहून कोणी ही त्या तरुणाला वाचवण्यास मध्ये पडले नाही. या मारहाणीमुळे तो तरुण इतका घाबरला होता की तो पोलिसात तक्रारही करायला घाबरत होता.
विवस्त्र करुन मारहाण: ठाण्यात एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आपण किती मोठे भाई आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काही गुंडानी एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली होती. ही घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मारहाण करणाऱ्या पाच तरुणांपैकी दोन तरुण अल्पवयीन आहेत. त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.