ETV Bharat / state

केंद्र, राज्य सरकार विरोधात कामगार संघटना एकवटल्या - कामगार संघटना

राज्य आणि केंद्र सरकारच्या आर्थिक निर्णयांवर आक्षेप घेत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने ठाण्यात केले आहे.

कामगार संघटनांचा मेळावा
author img

By

Published : Apr 12, 2019, 12:10 AM IST

ठाणे - महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना उमेदवारांचा पराभव करावा आणि लोकशाही मूल्यांना मानणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने केले आहे.

कामगार संघटनांचा मेळावा

सार्वजनिक क्षेत्राची विक्री खासगी उद्योगपतींना करणे, राष्ट्रीय संपत्तीचे मोजक्या भांडवलदार मित्रांना वितरण करणे. राफेल प्रकरणातील सरकारची भूमिका, कामगार आणि शेतकऱ्यांच्या ठेवीतून विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोक्सी सारख्या ७००० कर्जबुडव्या उदयोगपतींना कर्ज देऊन परतफेड न करता, त्यांना देशाबाहेर पलायन करण्यासाठी सरकारी यंत्रनांनी मदत केल्याचा आरोप या संघटनाच्या वतीने करण्यात आला. या वेळी 'अब की बार भाजप सरकार हद्दपार' अशी घोषणाही देण्यात आली. याअनुषंगाने ठाण्यात झालेल्या बैठकीत इंटक, हिंदू मजदूर सभा, एनटीयूआय या कामगार संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता.

Intro:कामगारांचा निर्धार ....अब की बार भाजप हद्दपार .... असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समिती ने दिला आहे .
Body:

महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान होईल .भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या उमेदवाराचा निर्णायक पराभव करावा आणि सक्षम व लोकशाही मूल्यांना मानणार्या तगडया उमेदवाराला निवडून दयावे असे आव्हान कामगार संघटना संयुक्त कृती समिती ने दिला आहे. सार्वजनिक क्षेञाची विक्री खाजगी उदयोगपतीना करणे, राष्ट्रीय संपत्ती मोजक्या बडया भांवलदार मिञाना देणे , राफेल प्रकरणात चौकीदार चोर आहे व अंबानीला फायदा झाला हे जनतेला समजले आहे तसेच बँकामधील गरीब , मध्यम वर्गीय कामगार शेतकरी यांच्या ठेवीतून विजय मल्ल्या , नीरव मोदी , मेहूल चोक्सी सारख्या ७००० कर्जबुडव्या उदयोगपतीनी कर्ज घेऊन परतफेड न करता देशाबाहेर पलायन करताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारची मदत घेतली आहे , यांची सामान्य जनतेला कल्पना आहे या करजबुडव्या चोराकडून भाजपच्या निवडणूक निधीतून करोडो रूपये जमा होत आहे असा गंभीर आरोप कामगार संघटना संयुक्त कृती समिती ने केला आहे . तसेच भाजपचे धोरणे -कामगार विरोधी आहे .भाजपची दिशा ही किसान विरोधी आणि खोटी आश्वाने देणारी , भारताची लूट खाजगीकरण करण्यासाठी सार्वजनिक सेवा मोडून काढणे हेच भाजपचे धोरण , फूट पाडण्याचे धोरण , भाजप सरकार म्हणजे झूट -लूट - फूट चे सरकार असे यावेळी सांगण्यात आले .व्देष भक्ती हयाचा अर्थ देशभक्ती हे समीकरण कधीच होऊ शकत नाही जनतेची एकजूट ठेवणे यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जनतेला केला आहे. यावेळी र.ग.कर्णिक , विश्वास उटगी , जयप्रकाश छाजेड (अध्यक्ष इंटक ) के के नायर( सरचिटणीस इंटक) शंकर साळवी (अध्यक्ष हिंदू मजदूर सभा) कॉ . एम ए पाटील (एन टी यू आय ) आदि मान्यवर उपस्थित होते .
Byte :-संजीव सानेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.